निकाल वेळेत लावण्यासाठी उत्तरपत्रिका तपासणी शाळा स्तरावर करावे ; शिक्षक संघटनांकडून राज्य मंडळाला सूचना

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षांना विलंब हाेत आहे. याचा थेट परिणाम परीक्षेनंतरच्या कामकाजावर होणार आहे. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. पुढील काही काळात संसर्गाचे प्रमाण कसे व काय असेल याचा अंदाज नसल्याने आतापासून राज्य मंडळाने पेपर तपासणीचे नियोजन करणे आवश्यक आहे.

    मुंबई: गेल्यावर्षी ऐन परीक्षेच्या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अचानक लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी दहावी, बारावीच्या निकालाला विलंब झाला. यंदा वाढत असलेले कोरोनाची रुग्णसंख्या लक्षात घेता एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेनंतर शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणी आणि मूल्यमापन प्रक्रिया गतीमान करण्यासाठी शाळास्तरावर उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन प्रक्रिया करावी अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली आहे. कोरोना काळात उत्तरपत्रिका विभागीय मंडळाच्या कस्टडीत नंतर शिक्षकांना यामुळे या प्रक्रियेस वेळ जाईल आणि संसर्गाचा धोका अधिक यामुळे हा निर्णय घ्यावा असेही शिक्षकांचे म्हणणे आहे.

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षांना विलंब हाेत आहे. याचा थेट परिणाम परीक्षेनंतरच्या कामकाजावर होणार आहे. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. पुढील काही काळात संसर्गाचे प्रमाण कसे व काय असेल याचा अंदाज नसल्याने आतापासून राज्य मंडळाने पेपर तपासणीचे नियोजन करणे आवश्यक आहे. परीक्षा झाल्यानंतर त्याच दिवशी पर्यवेक्षक, नियामक यांना देण्यात येणाऱ्या सूचनांसाठी त्याच दिवशी नियमकांची ऑनलाइन सभा घ्यावी. उत्तरपत्रिका तपासणीविषयक सूचना देण्याची गरज असल्याचे मत राज्य शिक्षक परिषदेकडून एक पत्र लिहून व्यक्त केल्याचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले.

    उत्तरपत्रिका तपासणीची अनेक कामे ई-मेल आणि ऑनलाईन माध्यमातून होऊ शकतात. गतवर्षी लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचायला पर्यवेक्षकापासून नियामकापर्यंत तसेच बोर्डापर्यंत पोहचण्यास वेळ लागल्यानेच निकालाला उशीर झाला होता. यंदाचेही नियोजन राज्य मंडळाने यासंदर्भात काटेकोरपणे आणि व्यवस्थित करावे अशी मागणी परिषदेची आहे. मुख्याध्यापक, विषय शिक्षक आणि उत्तरपत्रिका तपासणीच्या कामासंदर्भात असलेल्या कर्मचाऱ्यांना जर शाळास्तरावर नियोजन करुन वाटप झाले तर निकाल वेळेत लागू शकतील अशी अपेक्षाही या पत्रातून केली आहे.