Arnab's Republic TV hit internationally, fined Rs 20 lakh

युकेच्या प्रसारण नियामक मंडळाने २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच यापुढे एखाद्या समाजाबद्दल किंवा द्वेषाची भावना निर्माण होईल असे कार्यक्रम दाखवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तशी नोटीसच रिपब्लिक टीव्हीला देण्यात आली आहे.

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना युकेच्या प्रसारण नियामक मंडळाने २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिपब्लिक टीव्हीला (Republic TV) युकेच्या हिंदी भाषिक प्रेक्षकांपर्यंत माहिती पोहचावायची आहे. यासाठी युकेमध्ये रिपब्लिक भारत या वाहिनीचे प्रसारण केले आहे. या वाहिनीवर पाकिस्तानी द्वेष पसरवणारा शो दाखवण्यात आला होता. या शोमुळे नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका रिपब्लिक भारत वर ठेवण्यात आला आहे. यूके’मधील हिंदी भाषिकांपर्यंत ‘रिपब्लिक भारत’ वाहिननीचं प्रसारण पोहोचविण्यासाठीचं लायसन्स असलेल्या ‘वर्ल्डव्ह्यू मीडिया नेटवर्क’ला ‘यूके’च्या प्रसारण मंडळानं २० लाखांच्या दंडाची नोटीस पाठवली आहे.

युकेच्या प्रसारण नियामक मंडळाने २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच यापुढे एखाद्या समाजाबद्दल किंवा द्वेषाची भावना निर्माण होईल असे कार्यक्रम दाखवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तशी नोटीसच रिपब्लिक टीव्हीला देण्यात आली आहे.

युकेच्या रिपब्लिक भारत वाहिनीवर अर्णब गोस्वामी यांचा पूछता है भारत या कार्यक्रमाचे ६ सप्टेंबर २०१९ रोजी प्रसारण झाले होते. या शोमध्ये झालेल्या चर्चेत पाकिस्तानबाबत वक्तव्य करण्यात आले आहे. पाकिस्तानी नागरिकांवर वारंवार हल्ला आणि त्यांच्याविरोधात द्वेष पसरवत असल्याचे वक्तव्य केले असल्याचे युकेच्या ऑफकॉमने म्हटले आहे.

प्रसारित कार्यक्रमात वारंवार पाकिस्तानी नागरिकांचा उल्लेख दहशतवादी, माकडं, गाढवं, भिकारी आणि चोर असा करण्यात आल्याचंही सांगण्यात आले आहे. पाकिस्तानचे शास्त्रज्ञ, डॉक्टर, खेळाडू, नेते सर्वजण दहशतवादी आहेत. तो पूर्ण देश दहशतवादी आहे. तुम्ही दहशतवाद्यांविरोधात लढत आहात, असे कार्यक्रमात म्हटलं होतं असा उल्लेख ऑफकॉमने प्रसिद्धीपत्रकात केला आहे. ऑफकॉमने चॅनेलला यावर स्पष्टीकरण देण्यास सांगितलं असून पुन्हा तो कार्यक्रम प्रसारित न करण्याच्या सूचनाही ऑफकॉमने दिल्या आहेत. तसेच दैनंदिन पातळीवर या वाहिनीवरील कार्यक्रमावर नजर ठेवण्यात येणार आहे.