
प्रवीण दरेकर हे बोगस 'मजूर' असल्याचे व मुंबई बँक, हजारो ठेवीदार व सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळं त्यांच्यावर आज फसवणुकीचा गुन्हा दाखल पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला आहे. यावर आता महाविकास आघाडी सरकारमधी मंत्री नेते तसेच आम आदमी पार्टीचे नेते आक्रमक झाले असून प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीला जोर वाढू लागला आहे. आमदार मनिषा कायंदे यांनी सुद्धा प्रवीण दरेकर यांनी अटक करण्याची मागणी केली आहे.
मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे बोगस ‘मजूर’ असल्याचे व मुंबई बँक, हजारो ठेवीदार व सरकारची वर्षानुवर्षे फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळं त्यांच्यावर आज फसवणुकीचा गुन्हा दाखल पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला आहे. यावर आता महाविकास आघाडी सरकारमधी मंत्री नेते तसेच आम आदमी पार्टीचे नेते आक्रमक झाले असून प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीला जोर वाढू लागला आहे. आमदार मनिषा कायंदे यांनी सुद्धा प्रवीण दरेकर यांनी अटक करण्याची मागणी केली आहे.
मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात प्रवीण दरेकर हा बोगस मजूर असूनही मुंबई बँकेचा अध्यक्ष होते. २०१४-१५ ते २०१९- २० या काळात मुंबई बँकेत प्रवीण दरेकर व गँगने जवळपास रुपये२००० कोटींचा आर्थिक घोटाळा व नियम धाब्यावर बसवून काम केल्याचे सहकार विभागाच्या चौकशी अहवाल व चाचणी लेखापरीक्षण अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोणाताही ‘पेन ड्राईव्ह बॉम्ब’ न देता आम्ही आपणास थेट हे अहवालच देण्यास तयार आहोत. असं आम आदमी पार्टीचे प्रवक्ते धनंजय शिंदे यांनी म्हटले आहे.
दम्यान प्रवीण दरेकरांना भाजपने आता तरी नारळ द्यावा आणि ओरिजनल भाजपच्या चांगल्या आमदाराला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद द्यावे अशी आप पक्षाची मागणी आहे. तसेच आता विधान परिषद शिवसेना आमदार मनिषा कायंदे यांनी सुद्धा प्रवीण दरेकर यांनी अटक करण्याची मागणी केली आहे. त्यामुळं दरेकरांवर आता कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.