महात्मा गांधीबद्दल चुकीचे बोलणाऱ्या कालीचरण या बोगस बाबाला अटक करण्याची मलिक यांची मागणी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षपार्ह बोलल्याबद्दल तसेच त्यांना चुकीचे बोलल्याबद्दल कालीचरण या बोगस बाबाला अटक करण्याची मागणी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. कालीचरण हा बोगस बाबा अकोला येथे याने महात्मा गांधीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात याच्यावर गुन्हा दाखल होऊन, याला त्वरित अटक करण्याची मागणी मलिक यांनी केली आहे.

    मुंबई : हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस आहे, त्यामुळे आज सभागृहात विधानसभा अध्यक्षाचे निवड होणार आहे, तसेच सकाळपासून राज्यातील विविध मुद्द्यावर सभागृहात विरोधकांनी सत्ताधारी यांची खडाजंगी पहायला मिळत आहे.

    दरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षपार्ह बोलल्याबद्दल तसेच त्यांना चुकीचे बोलल्याबद्दल कालीचरण या बोगस बाबाला अटक करण्याची मागणी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. कालीचरण हा बोगस बाबा अकोला येथे याने महात्मा गांधीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात याच्यावर गुन्हा दाखल होऊन, याला त्वरित अटक करण्याची मागणी मलिक यांनी केली आहे.

    महाराष्ट्र सरकार आणि गृहमंत्री यांनी तात्काळ या बोगस बाबावर कारवाई केली पाहिजे, असे मलिक यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना मलिक यांनी मोदी सरकार व सुद्धा टीका केली आहे जेव्हापासून मोदी सरकार देशात आले आहे, तेव्हापासून देशात राष्ट्रपिता महात्मा गांधीबद्दल अपमानास्पद वक्तव्य तसेच आक्षेपहार्य बोलण्याच्या घटनेमध्ये वाढ झाल्याचे सुधा नवाब मलिक यांनी म्हटलंय. तसेच देशात मोदी आल्यापासून अशा चुकीच्या घटना वाढत असल्याची टीका सुद्धा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.