आर्यन खानने दिली होती ८० हजारांच्या ड्रग्जची ऑर्ड़र, मित्रांना एनसीबीच्या कारवाईचीही दिली होती धमकी, वाचा आर्यन-अनन्याचे व्हॉट्सअप चॅट

व्हॉट्सअप चॅटमध्ये आर्यन खानने अर्चित कुमारशी होलसेलमध्ये ड्रग्ज खरेदी करण्याचे संभाषण आहे. अर्चित कुमारकडून ८० हजारांचे ड्रग्ज आर्यनने मागवले असल्याचे पुरावे या चॅटमध्ये असल्याची माहिती आहे. आर्यनकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये इतर दोघांशीही ड्रग्जबाबत झालेले चॅट एनसीबीच्या हाती लागले आहेत. अनन्याच्या व्यतिरिक्त अन्य तीन सेलिब्रिटींच्या मुलांशी आर्यन खानच्या झालेल्या चॅट्सची माहिती एनसीबीकडे आहे.

  मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामिनावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. यात एनसीबी आर्यन खान आणि नन्या पांडे यांच्यात व्हॉट्सअपवर झालेल्या चॅटची चौकशी करत आहे. इंडिया टुडेच्या माहितीनुसार या दोघांमध्येही ड्रग्ज खरेदीबाबत चर्चा झाली होती.

  आर्यन खानने आपल्या मित्रांना एनसीबीमार्फत सगळ्यांवर कारवाई करेन, अशी गमतीत धमकीही दिली होती. दोघांमधील या व्हॉट्सअप चॅटचा उपयोग दोघांच्याही चौकशीत करण्यात येत आहे. आर्यन गेल्या १८ दिवसांपासून आर्थर रोड जेलमध्ये आहे, त्याचा जामीन दोन वेळा एनडीपीएस कोर्टाने नाकारला आहे. तर अनन्या पांडेची दोन वेळा एनसीबीने चौकशी केली आहे.

  ८० हजारांच्या ड्रग्जची खरेदी
  या व्हॉट्सअप चॅटमध्ये आर्यन खानने अर्चित कुमारशी होलसेलमध्ये ड्रग्ज खरेदी करण्याचे संभाषण आहे. अर्चित कुमारकडून ८० हजारांचे ड्रग्ज आर्यनने मागवले असल्याचे पुरावे या चॅटमध्ये असल्याची माहिती आहे. आर्यनकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये इतर दोघांशीही ड्रग्जबाबत झालेले चॅट एनसीबीच्या हाती लागले आहेत. अनन्याच्या व्यतिरिक्त अन्य तीन सेलिब्रिटींच्या मुलांशी आर्यन खानच्या झालेल्या चॅट्सची माहिती एनसीबीकडे आहे. काही ड्रग्ज सप्लायर आणि पेडलर आपल्या नेटवर्कचा विस्तार करत होते, आणि त्यांना बॉलिवूड आणि ग्लॅमच्या जगामध्ये एन्ट्री करायची होती. अनन्या पांडेकडे एक ड्रग्ज सप्लायर या दृष्टीकोनातून तपास करण्यात येतो हे. अनन्या कमी प्रमाणात का असेना, पण या सर्व प्रकरणात सहभागी असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

  चॅटमध्ये नेमके काय
  पहिले संशयास्पद संभाषण हे जुलै २०१९चे आहे. या व्हॉट्स्प चॅटमध्ये आर्यन आणि अनन्या यांच्यात ड्रग्जबाबत संभाषणाचे पुरावे आहेत. यात आर्यनच्या याबाबतच्या छोट्या छोट्या मागण्या अनन्या पूर्ण करत सल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. पहिले चॅट
  आर्यन – मी तुझ्याकडून हे गुप्तपणे घेईन
  अनन्या- ठीक आहे

  याच दिवशीचे दुसरे संभाषण
  अनन्या- आत्ता मी या व्यवसायात आहे
  आर्यन – तू वीड आणलेस का
  आर्यन – अनन्या
  अनन्या- मला मिळत आहे
  एनसीबीला मिळालेल्या नव्या चॅटमधअये १८ एप्रिल २०२१ रोजी र्यनने आपल्या मित्रांना कोकेनबाबत विचारणा केली होती
  आर्यन – चला उद्या कोकेन घेऊ या
  आर्यन – मी तुम्हा सर्वांना अडकवीन
  आर्यन- एनसीबीकडून

  उपहास हा आहे की आर्यन आपल्या मित्रांना गमतीत एनसीबीच्या नावाने धमकी देत होता. त्यानंतर ३ ऑक्टोबरला एका क्रूझवर ड्रग्ज प्रकरणात त्यालाच अटक करण्यात आली आहे.