आर्यन खानला आज देखील जामीन नाहीच, उद्या पुन्हा होणार सुनावणी, वाचा काय झाला न्यायालयात युक्तीवाद

जवळपास तीन आठवडे उलटून गेलेत तरी मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी त्याला जामीन मिळालेला नाहीये. वारंवार त्याचा जामीन अर्ज फेटाळला जातोय. काल त्याच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र एकाच पक्षाची बाजू न्यायालयाने ऐकून घेतली. आज दुसरी बाजू ऐकल्यानंतर आर्यन खानला बेल की मग पुन्हा जेल याचा फैसला न्यायालय सुनावणार आहे.

    ड्रग प्रकरणी आर्यन खानच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, आज देखील आर्यनच्या जामिनावर निर्णय होऊ शकला नाही. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी गुरुवारपर्यंत तहकूब केली आहे. म्हणजेच या प्रकरणाची पुढील सुनावणी उद्या होणार आहे.

    जवळपास तीन आठवडे उलटून गेलेत तरी मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी त्याला जामीन मिळालेला नाहीये. वारंवार त्याचा जामीन अर्ज फेटाळला जातोय. काल त्याच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र एकाच पक्षाची बाजू न्यायालयाने ऐकून घेतली. आज दुसरी बाजू ऐकल्यानंतर आर्यन खानला बेल की मग पुन्हा जेल याचा फैसला न्यायालय सुनावणार आहे.

    आर्यनच्या बाजूने मुकूल रोहतगी यांनी तब्बल दोन तास युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक माहिती देतानाच आर्यन खान कसा निर्दोष आहे हे कोर्टासमोर ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. क्रुझवर जाण्यापूर्वीच आर्यन खानला अटक करण्यात आली. अटक करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली नव्हती, असं रोहतगी यांनी कोर्टाला सांगितलं.

    अमित देसाई यांचा युक्तिवाद ऐकून न्यायाधीश सांबरे म्हणाले- तुमचा युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी अजून किती वेळ लागणार आहे. त्यावर देसाई म्हणाले- ३० मिनिटे. न्यायमूर्ती सांबरे यांनी त्याला अडवून सांगितले – मग उद्या या प्रकरणाची सुनावणी होईल.

    दरम्यान, हायकोर्टाने युक्तीवाद पुढे ढकलला. तीनही आरोपींच्या वकिलांनी आज युक्तीवाद केला. कोर्टाचं कामकाज संपल्याने आजची सुनावणी उद्यावर ढकलण्यात आली आहे, उद्या एनसीबीच्या वतीने युक्तीवाद होईल.