महावितरणमध्ये तब्बल 25 हजार 800 अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदे रिक्त; प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना लवकरच नोकरी मिळणार

महावितरणमध्ये एकूण पदांच्या जवळपास 32 टक्के पदे रिक्त आहेत.  प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. वर्ग एकमधील 17 टक्के, वर्ग दोनमधील 12 टक्के पदे रिक्त आहेत. तर, वर्ग तीनमधील 34 टक्के तर वर्ग चारमध्ये 35 टक्के रिक्त पद आहेत. वर्ग तीन आणि चारमधील कर्मचारी प्रत्यक्ष फिल्डवर काम करत असून त्यांच्याच रिक्त पदांची संख्या मोठी आहे.

    मुंबई : महावितरणमध्ये तब्बल 25 हजार 800 अधिकारी-कर्मचाऱयांची पदे रिक्त आहेत. अपुरे मनुष्यबळ त्यातच निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. यामुळे लवकरात लवकर पदभरती व्हावी अशी मागणी केली जात आहे.

    महावितरणमध्ये एकूण पदांच्या जवळपास 32 टक्के पदे रिक्त आहेत.  प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. वर्ग एकमधील 17 टक्के, वर्ग दोनमधील 12 टक्के पदे रिक्त आहेत. तर, वर्ग तीनमधील 34 टक्के तर वर्ग चारमध्ये 35 टक्के रिक्त पद आहेत. वर्ग तीन आणि चारमधील कर्मचारी प्रत्यक्ष फिल्डवर काम करत असून त्यांच्याच रिक्त पदांची संख्या मोठी आहे.

    महावितरणचे राज्यभरात अडीच कोटी वीज ग्राहक असून त्यांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी 87 हजार 627 अधिकारी-कर्मचाऱयांची मंजूर पदे आहेत. या मंजूर पदांपैकी आज 68 टक्के कर्मचारी-अधिकारी कार्यरत असून जवळपास 32 टक्के पदे रिक्त आहेत. वर्ग-1 मध्ये 1676 पदे मंजूर असली तरी 230 पदे रिक्त आहेत. वर्ग-2 मध्ये 6433 मंजूर पदे असून त्यापैकी 708 पदे रिक्त आहेत.

    दरम्यान, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. अंतर्गत पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी (डिस्ट्रिबूशन) पदभरती प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना 12 जुलै कागदपत्र पडताळणी करिता बोलवण्यात आले आहे. तांत्रिक स्थापना विभाग, चौथा मजला महावितरण, कॉर्पोरेट कार्यालय, प्रकाशगड अनंत कानेकर रोड रोड बांद्रा, (पूर्व) या पत्त्यावर हजर रहावे. https://bit.ly/3gU2ij1 या लिंकवर जाऊन उमेद्वारांना प्रतीक्षा यादी डाउनलोड करता येईल.