Ashish Shelar's criticism of Nawab Malik

हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे साधी लवंगीही लावू शकले नाहीत. लवंगी लावण्याचा प्रयत्न केला, त्यात हात पोळले आणि म्हणून त्यांची हतबलता, घालमेल इतकी होती की, त्यांना हायड्रोजन सोडून ऑक्‍सिजनची गरज लागेल, असे वाटले, असे म्हणत भाजपा नेते आशिष शेलार यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे(Ashish Shelar's criticism of Nawab Malik).

    मुंबई : हायड्रोजन बॉम्बची भाषा करणारे साधी लवंगीही लावू शकले नाहीत. लवंगी लावण्याचा प्रयत्न केला, त्यात हात पोळले आणि म्हणून त्यांची हतबलता, घालमेल इतकी होती की, त्यांना हायड्रोजन सोडून ऑक्‍सिजनची गरज लागेल, असे वाटले, असे म्हणत भाजपा नेते आशिष शेलार यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे(Ashish Shelar’s criticism of Nawab Malik).

    आशिष शेलार म्हणाले, मुन्ना यादव, हाजी हैदर, हाजी अराफतचा भाऊ, रियाझ भाटी, समीर वानखेडे अशी अनेक नावं घेऊन त्यांनी खूप मोठे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला, पण तो विफळ ठरला. याचे कारण फडणवीसांशी जोडणे याचा प्रयत्न मलिकांनी केला, पण त्यात सत्य नाही, असे म्हणत मलिकांनी केलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावा शेलारांनी केला.

    माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यानिशी नवाब मलिक यांचे गैरव्यवहार उघडकीस आणल्यानंतर मलिक सैरभैर झाले आहेत. फडणवीस यांच्यावर बेछूट आणि खोटारडे आरोप करून ते स्वतःची कबर स्वतःच खणत आहेत, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. पाटील म्हणाले की, नवाब मलिक हायड्रोजन बॉम्बचा स्फोट करणार होते पण त्यांनी प्रत्यक्षात फुसके आरोप केले.

    टाडाच्या आरोपींकडून कवडीमोल किंमतीने जमीन खरेदी केल्याचे ते स्वतःच मान्य करत आहेत. फडणवीस यांनी आता एकाच विषयाची माहिती उघड केली आहे. त्यांच्याकडे अधिक माहिती आहे. ते त्यांच्याकडे असलेली माहिती योग्य यंत्रणांकडे सादर करणार आहेत. त्यानुसार जी चौकशी आणि कारवाई होईल त्याला तोंड देण्याचा विचार मलिक यांनी करावा, असे पाटील म्हणाले.

    ज्या पद्धतीने आरोप केला त्यातले सत्य हे आहे की, त्या प्रकरणात पकडला गेलेला इमरान आलम शेख हा हाजी अराफतचा भाऊ होता. तो काँग्रेसचा तत्कालीन सचिव होता. तो काँग्रेसचा सचिव होता. आता ज्यावेळी मलिक आरोप करत आहेत, त्यावेळी तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे सामान्य माणसांना फसवण्याचा, लटकवण्याचा जो राष्ट्रवादीचा धंदा आहे, त्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आरोप करण्याचा प्रयत्न मलिकांनी केला.

    - आशीष शेलार, आमदार, भाजपा