रायगडमध्ये दिवसाढवळ्या महिला सरपंचाची हत्या; विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची निवेदनाची मागणी

रायगड जिल्ह्यामध्ये एका महिला सरपंचाची हत्या करण्यात आल्याची गंभीर घटना काल घडली आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना राज्यात अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने याविषयी तातडीने निवेदन करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे विधान परिषदेत केली(Assassination of a woman sarpanch in broad daylight in Raigad; Opposition leader Pravin Darekar's statement demanded).

    मुंबई : रायगड जिल्ह्यामध्ये एका महिला सरपंचाची हत्या करण्यात आल्याची गंभीर घटना काल घडली आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना राज्यात अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने याविषयी तातडीने निवेदन करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे विधान परिषदेत केली(Assassination of a woman sarpanch in broad daylight in Raigad; Opposition leader Pravin Darekar’s statement demanded).

    हा विषय गंभीर असून याप्रकरणाची आपण माहिती घेतली आहे व यादृष्टीने तपास सुरु असल्याची माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी दिली.

    विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सांगितले की, कालच विधानपरिषदेत कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा करण्यात आली. आज या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात अतिशय तीव्र भावना आहेत. गुन्हेगारांना कशाचीही भीती उरलेली नाही, हेच याघटनेवरून दिसून येते. रायगड मधील महाड तालुक्यातील मौजे आदिस्ते येथील मीनाक्षी मनोहर खिडबिडे या महिला सरपंच होत्या.

    या सरपंच महिला अतिशय गरीब कुटुंबातील होत्या. जंगलात रस्त्याच्या कडेला काल दुपारी त्यांचा मृतदेह सापडला.त्यांच्यावर बलात्कार झाल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. लाकुडफाटा आणण्यासाठी त्या गेल्या होत्या. सायंकाळी महाडच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांचा मृतदेह आणण्यात आला. ग्रामीण रुग्णालयात महिला डॉक्टर नाहीत.

    बलात्कार झाल्याचा संशय असल्यामुळे महाडचे आरएमओ डॉ. भास्कर जगताप यांनी सेकंड ओपिनियनसाठी मृतदेह जे.जे.रुग्णालयाकडे पाठवला आहे. गावापासून 500 मीटर अंतरावर त्यांचा मृतदेह सापडला होता, अशी माहिती दरेकर यांनी विधान परिषद सभागृहाला दिली.