अ‍ॅट्रॉसिटी प्रकरण: परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा जबाबा नोंदवला

परमबीर(Parambir Singh) यांच्यासह 32 पोलीस अधिकाऱ्यांनी भीमराव घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अकोल्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात (ऑनलाइन) गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय दंड संहिता आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासह विविध 22 कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रकरण ठाणे येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात तपासासाठी वर्ग करण्यात आला. आता याचा तपास पुढे सरकत आहे.

    मुंबई : ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर सिंह(Parambir Singh) यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी पोलीस महासंचालक तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालकांकडे केली होती. या प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली असून परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

    परमबीर(Parambir Singh) यांच्यासह 32 पोलीस अधिकाऱ्यांनी भीमराव घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अकोल्यातील कोतवाली पोलीस ठाण्यात (ऑनलाइन) गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय दंड संहिता आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यासह विविध 22 कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून प्रकरण ठाणे येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात तपासासाठी वर्ग करण्यात आला. आता याचा तपास पुढे सरकत आहे.

    एसीबीने भीमराव घाडगे यांचा जबाब नोंदवला आहे. एसीबीने घाडगे यांनी केलेल्या आरोपात खुली चौकशी सुरू केली आहे.एसीबीने काल भीमराव घाडगे यांचा जबाब नोंदवला असून लवकरच आणखी लोकांचेही जबाब नोंदवले जाणार आहेत. भीमराव घाडगे हे सध्या ठाण्याच्या जातपडताळणी विभागात कार्यरत आहेत. दरम्यान, हा गुन्हा रद्द करण्यात यावा म्हणून परमबीर सिंह यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.