एटीएसची मोठी कारवाई, वांद्र्यातून एका दहशतवाद्याला अटक

एटीएसने विशेष मोहीम हाती घेऊन एका दाहशवाद्याला वांद्रेच्या(One Terrorist Arrested From Vandre) खेरवाडी(Kherwadi) भागातून आज अटक केली. मोहम्मद इरफान रहमत अली शेख (५०)असे या संशयिताचे नाव आहे .

    मुंबई : दिल्लीत अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांचे महाराष्ट्र आणि मुंबई कनेक्शन स्पष्ट झाल्यानंतर राज्य दहशतवादी विरोधी पथकाने(ATS) सातत्याने या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांत राज्याच्या विविध भागातून आणखी चार दहशतवाद्यांना अटक(4 Terrorist Arrested In Maharashtra) झाली आहे. महाराष्ट्र एटीएसने विशेष मोहीम हाती घेऊन आणखी एका दाहशवाद्याला वांद्रेच्या(One Terrorist Arrested From Vandre) खेरवाडी भागातून आज अटक केली. मोहम्मद इरफान रहमत अली शेख (५०)असे या संशयिताचे नाव आहे . तो पेशाने लेडीज टेलर आहे. बॉम्बस्फोटाचा कट रचल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र एटीएसने  त्याला ताब्यात घेतले.

    बॉम्बस्फोटाचा कट रचल्याच्या आरोप
    दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या  धारावी मधील जान मोहम्मद शेखच्या संपर्कात असलेल्या व देशात घातपाती कारवायांच्या तयारीत असलेल्या पाकिस्तानातील अन्थोनी याच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून झाकीर हुसेन शेख याला १८ सप्टेंबर रोजी एटीएसने जोगेश्वरीतून अटक केली होती. त्याच्या चौकशीत मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंब्रा येथून रिझवान इब्राहिम मोमीन याला १९ सप्टेंबर रोजी अटक केली. या दोघांचे कनेक्शन अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस इब्राहिम याच्याशी असल्याचे समोर आले होते. शस्त्रे पुरवण्याची जबाबदारी या दोघांकडे देण्यात येणार होती अशी माहिती आहे. सध्या या दोघांचा ताबा एटीएसला मिळाला आहे. त्यानंतर आणखी संशयितांचा शोध महाराष्ट्र एटीएसने सुरू केला. बुधवारी रात्री एटीएसने बॉम्बस्फोटाचा कट रचल्याच्या आरोपावरून मोहम्मद इरफान रहमत अली शेख याला चौकशी साठी ताब्यात घेतले होते. आज त्याला अटक करण्यात आली आहे.