मुंबईत जोगेश्वरीत आणखी एका संशयित दहशतवाद्याला एटीएसने केली अटक, मुंबईवर हल्ला करण्याची होती तयारी

मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र एटेसने केलेल्या संयुकर्त कारवाईत जाकीरला अटक करण्यात आली असून, त्याची या प्रकरणात अधिक चौकशी सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोटा स्टेशनवर अटक करण्यात आलेल्या जान मोहम्मद याने जाकीरला हत्यारे आणि स्फोटके मुंबईत आणण्यासाठी सांगितले होते, असे तपासात समोर येते आहे.

    मुंबई- मुंबईच्या जोगेश्वरी परिसरातून जाकीर नावाच्या संशयिताला महाराष्ट्र एटीएसने अटक केली आहे. ही मोठी कारवाई मानण्यात येत आहे. दिल्लीत अटक करण्यात आलेल्या सहा संशयित दहशतवाद्यांशी जाकीरचा संबंध होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. जाकीरच्या आधी दिल्ली पोलिसांनीं मुंबईचा रहिवासी असलेल्या जान मोहम्मद नावाच्या संशयीत दहशतवाद्याला कोटा रेल्वे स्टेशनवर अटक केली होती.

    मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र एटेसने केलेल्या संयुकर्त कारवाईत जाकीरला अटक करण्यात आली असून, त्याची या प्रकरणात अधिक चौकशी सुरु आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोटा स्टेशनवर अटक करण्यात आलेल्या जान मोहम्मद याने जाकीरला हत्यारे आणि स्फोटके मुंबईत आणण्यासाठी सांगितले होते, असे तपासात समोर येते आहे.

    जान महोम्मद २० वर्षांपासून डी गँगच्या संपर्कात

    दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केलेला जान मोहम्मद हा मुंबईतील धारावी परिसरातील रहिवासी आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला जान गेल्या २० वर्षआंपासून दाऊद गँगशी संबंधित असल्याची माहितीही समोर आली आहे. जान मोहम्मद शेखवर कर्ज होते, आणि त्याला पैशांची गरज होती. त्याने कर्ज घेऊन टॅक्सी विकत घेतली होती, मात्र कर्जाची परतफेड शक्य नसल्याने त्याने पुन्हा दाऊद गँगला संपर्क केला होता.

    मुंबईवर हल्ला करण्याचे होते प्लॅनिंग

    दिल्लीत अटक करण्यात आलेल्या सहा संशयीत दहशतावाद्यांचा गणेशोत्सवाच्या काळात मुंबई आणि देशाच्या इतर काही शहरांत बॉम्बस्फोट घडविण्याचा कट होता. या सहा जणांच्या अटकेपूर्वीच मुंबईतील रेल्वे पोलिसांना संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या कटाची माहिती मिळाली होती. रेल्वेत गॅस अटॅक किंवा प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या गर्दीला रेल्वेने चिरडण्याची योजना सल्याचीही माहिती मिळाली होती. दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारावीनंतर मुंबईतील रेल्वे स्टेशनांच्या परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तसेच रेल्वे स्टेशनांच्या जवळच्या परिसरात रेल्वे पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.