लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय शीव, मुंबई,
लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय शीव, मुंबई,

सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील सुरक्षा रक्षकावर अज्ञात व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला. यात सुरक्षा रक्षक जखमी झाला आहे(Attack on security guard at Sion Hospital).

    मुंबई : सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील सुरक्षा रक्षकावर अज्ञात व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला. यात सुरक्षा रक्षक जखमी झाला आहे(Attack on security guard at Sion Hospital).

    हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले असून तो मनोरुग्ण असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र इतर सुरक्षा रक्षकांनी वेळीच गांभीर्य ओळखून त्या हल्लेखोराला पकडले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

    हल्ल्यात जयप्रकाश बोरजी या सुरक्षा रक्षकावर त्या व्यक्तीने पाठीमागून येऊन फावड्याने हल्ला केला असल्याचे अन्य एका सुरक्षा रक्षकाने सांगितले. शिवाय तो रुग्णालय परिसरातील इतर लोकांच्या देखील मागे लागला. मात्र, इतर सुरक्षा रक्षकांनी त्वरीत त्याला ताब्यात घेतले. हल्ल्यात बोरजी यांच्या डोक्याला आणि हाताला जबर जखम झाली.