जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून अनिल परबांच्या घराबाहेर शाई फेकण्याचा प्रयत्न! कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन बेमुदत संपाला अनेक संघटनेनं तसेच राजकीय पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यातील जनशक्ती संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज अनिल परब यांच्या घराबाहेर राडा घातला. परब यांच्या घरावर शाई फेकण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केला. पण वेळीच या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

    मुंबई : मागील पंधरा दिवसांपेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन राज्यभरात सुरु आहे, एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी संप करत आंदोलन करण्यात येत आहे. आता हे आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन बेमुदत संपाला अनेक संघटनेनं तसेच राजकीय पक्षांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यातील जनशक्ती संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज अनिल परब यांच्या घराबाहेर राडा घातला. परब यांच्या घरावर शाई फेकण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केला. पण वेळीच या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

    राज्यात मागील १५ दिवसांहून अधिक काळ एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. आता या आंदोलनाला जनशक्ती संघटनेनं सुद्धा पाठिंबा दिला आहे. या संघटनेचं कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर राडा घातला. परब यांच्या घरावर शाई फेकण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवलं. तेव्हा रस्त्यावर झोपून त्यांनी आपला निषेध व्यक्त केला. त्यावेळी पोलिसांनी जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. बैठाकाचं सत्र सुरु आहे, मात्र आंदोलनावर तोडगा निघत नाही, त्यामुळं जनशक्ती संघटनेचे कार्यकर्त्यांनी परब यांच्या घरासमोर आपला निषेध व्यक्त केला.

    काल न्यायालयात सुनावणी पार पडली असता, न्यायानयाने २० डिसेंबरची पुढील सुनावणीची तारीख दिली आहे. प्रहार जनशक्ती संघटनेतून अतुल खुपसे बाहेर पडले होते. त्यांनी जनशक्ती संघटना स्थापन केली. त्या संघटनेनं एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. या संघटनेचे काही कार्यकर्ते आज गनिमी काव्यानं अनिल परब यांच्या निवासस्थानासमोर पोहोचले. त्यांनी परब यांच्या घरासमोर निदर्शनं केली. इतकंच नाही तर परब यांच्या निवासस्थानावर शाई फेकण्याचाही प्रयत्न या कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. या प्रकरानंतर परब यांच्या निवासस्थानासमोर साफसफाईही करण्यात आली. जनशक्ती संघटनेच्य़ा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल, असं सांगण्यात येत आहे.