PHOTO : संजय राऊतांच्या मुलीच्या लग्नात शरद पवार, राज ठाकरेंसह मान्यवरांची उपस्थिती

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कन्येचा विवाहसोहळा मुंबईत शाही पद्धतीनं पार पडला. राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत हिचा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी लग्न झालं. आज हॉटेल रेंनिसांस इथे हा विवाह पार पडला.

  शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत हिचा विवाहसोहळा आज सोमवार २९ नोव्हेंबर २०२१ रोजी पार पडणार पडला. राऊतांच्या मुलीच्या लग्नसोहळ्याला अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. पूर्वशीच्या लग्न समारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सपत्निक हजेरी लावली आहे.

  कोण कोण उपस्थित

  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सपत्निक हजेरी लावली

  राज ठाकरे यांनी सपत्निक हजेरी लावली

  मंत्री छगन भुजबळ यांनी हजेरी लावली

  आमदार प्रताप सरनाईक यांची उपस्थिती