खरे सूत्रधार ‘सिल्व्हर ओक’ आणि ‘वर्षा’वर बसलेत, ईडीच्या कारवाईनंतर अतुल भातखळकरांचा आरोप

भाजपचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar Reaction) यांनी व्टिट करत ‘खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत’, असा आरोप केला आहे.

    मुंबई:  माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकत ईडीने(Ed Raid On Anil Deshmukh`s House) कारवाई केल्यानंतर विरोधकांनी प्रतिक्रियांचा सपाटा लावला आहे. भाजपचे मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar Reaction) यांनीदेखील व्टिट करत ‘खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसलेत’, असा आरोप केला आहे.

    उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर आरोप
    या ट्विटमध्ये त्यांनी अनिल परब आणि अनिल देशमुख हे दोघेही केवळ प्यादी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ईडीची कारवाई ज्यांच्यावर झाली ते अनिल देशमुख आणि त्याच प्रकारचे आरोप असलेले अनिल परब ही प्यादी आहेत. खरे सूत्रधार सिल्व्हर ओक आणि वर्षावर बसले आहेत. त्यामुळे भातखळकर यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरच आरोप केले आहेत.