
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारकडून 75 आठवड्यांचे ‘आझादी का अमृत महोत्सव’ हे विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. हे अभियान म्हणजे फक्त मैलाचा दगड ठरू नये तर देशाच्या उज्ज्वल भविष्यामध्ये प्रत्येक नागरिकाचा सकारात्मक सहभाग असला पाहिजे या हेतून नागरिकांना प्रोत्साहित व प्रेरित करण्यासाठी रावबण्यात येणार आहे.
मुंबई, केंद्र सरकारने 2019 मध्ये राबवलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानांतर्गत राबवलेल्या ‘प्लास्टिकचा वापर टाळा’ (say no to plastic) या मोहीमेला देशातील विद्यापीठ व महाविद्यालयातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. मात्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या ‘आझादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमांमतर्गत ही मोहीम पुन्हा राबवण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांना एकदा वापरता येणार्या प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत अभियान राबवण्याच्या सूचना देऊन त्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारकडून 75 आठवड्यांचे ‘आझादी का अमृत महोत्सव’ हे विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. हे अभियान म्हणजे फक्त मैलाचा दगड ठरू नये तर देशाच्या उज्ज्वल भविष्यामध्ये प्रत्येक नागरिकाचा सकारात्मक सहभाग असला पाहिजे या हेतून नागरिकांना प्रोत्साहित व प्रेरित करण्यासाठी रावबण्यात येणार आहे. त्यामुळे ‘प्लास्टिकचा वापर टाळा’ या थीमअंतर्गत जनजागृती करून एकदा वापरता येणार्या प्लास्टिकचा वापर टाळण्यासंदर्भात नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे.
‘प्लास्टिक कचर्याचा पुनर्वापर सुधारणा कायदा 2021’ यामुळे नागरिकांमध्ये प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील सर्व विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालये आणि संस्था यांना यूजीसीकडून परिणामकारक जनजागृती कार्यक्रम राबवण्याची विनंती करण्यात आली आहे. विद्यापीठे व महाविद्यालयांना त्यांनी केलेल्या कार्यक्रमाचा अहवाल यूजीचीया संकेतस्थळावर अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.