
स्कॉटलंडमध्ये सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेमध्ये महाराष्ट्राचा(Maharashtra Policy Praised In Climate Change Conference) हवामान बदलासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांचे चिरंजीव आणि राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या धोरणामुळे जगभरातील हवामान बदल आणि त्याचे होणारे परिणाम याबाबत स्कॉटलंडमध्ये सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेमध्ये महाराष्ट्राचा(Maharashtra Policy Praised In Climate Change Conference) हवामान बदलासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. COP26 परिषदेत महाराष्ट्राला Inspiring Regional Leadership हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे Under2 Coalition Leadership Awards 2021 पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. स्कॉटलंडमध्ये तीन पुरस्कारांपैकी एक पुरस्कार महाराष्ट्राने पटकावला असून राज्याच्या वतीने महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे.
निसर्गाच्या पारंपरिक पाच घटकांकडे जास्त लक्ष
पुरस्कारानंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले आहे की, हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भारतात महाराष्ट्राला पुढाकार घ्यायचा आहे. राज्याचे मुख्यमंत्री हे वन्यजीव प्रेमी आणि संवर्धनवादी आहेत. त्यांनीच हरित भविष्य पाहण्याची प्रेरणा दिली आहे. माय प्लॅनेट अशी चळवळ आम्ही सुरु केली असून निसर्गाच्या पारंपरिक पाच घटकांकडे जास्त लक्ष देत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्राच्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख
हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला व देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे. तसेच शाश्वत भविष्यासाठी जगभरात क्लायमेट ग्रुप स्थानिक शासकीय संस्थांसह कार्यरत आहेत आणि त्यांच्यासह विविध उपाययोजनांवर आम्ही काम करणार आहोत. महाराष्ट्राच्या या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळाल्याचे समाधान असल्याची भावना आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या COP26 कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राला Inspiring Regional Leadership साठी पुरस्कार मिळाला. आपल्या Climate Partnerships & Creative Climate Solutions ची येथे विशेष दखल घेतली. हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला व देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो. pic.twitter.com/hmyMaeyUSw
— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 7, 2021
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी यासंदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. उप-राष्ट्रीय स्तरावर हवामान वाचवण्याच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांना अंडर २ कोलिशनने मान्यता दिली. जे राज्ये आणि प्रदेशांचे सर्वात मोठे जागतिक नेटवर्क हवामान कृतीसाठी वचनबद्ध आहे. इतर दोन पुरस्कार ब्रिटिश कोलंबिया (कॅनडा) यांनी क्रिएटिव्ह क्लायमेट सोल्युशन्ससाठी आणि क्वेबेक (कॅनडा) यांनी हवामान भागीदारीसाठी जिंकले. महाराष्ट्र (भारत) ने अंडर २ च्या तीनही श्रेणींसाठी प्रवेशिका दिल्या होत्या.