सर्व खाजगी शाळांना बच्चू कडू यांनी दिला निर्वाणीचा इशारा, फी वसूल केल्यास होणार कारवाई

बच्चू कडू म्हणाले की, सर्व खाजगी शाळा ह्या धर्मदाय ॲक्ट अंतर्गत नोंदणीकृत आहेत. जर खाजगी कंपनी प्रमाणे मनमानी करुन पालकांकडून फी वसुल केल्यास किंवा पालकांची पिळवणूक केल्यास शाळेवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार, उद्योगधंदे ठप्प असल्यामुळे नागरिकांपुढे आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. (Bachchu Kadu warned all private schools) तसेच शाळकरी मुलांचे ऑनलाईन अभ्यास सुरु करण्यात आले आहेत. त्यामुळे काही शाळांनी(private schools) पालकांकडे फी साठी तगादा लावल्याचे समजते आहे. यावर बच्चू कडू यांनी वक्तव्य केले आहे. त्यांनी सर्व खाजगी संस्थापक व मुख्यध्यापकांना इशारा दिला आहे.

बच्चू कडू म्हणाले की, सर्व खाजगी शाळा ह्या धर्मदाय ॲक्ट अंतर्गत नोंदणीकृत आहेत. जर खाजगी कंपनी प्रमाणे मनमानी करुन पालकांकडून फी वसूल केल्यास किंवा पालकांची पिळवणूक केल्यास शाळेवर कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे. अशा आशयाचे ट्विट बच्चू कडू यांनी केले आहे. आपण शाळांची धर्मदाय ॲक्ट अंतर्गत शाळांची नोंदणी केली आहे. धर्मदाय म्हणजे सेवाभावनेच्या उद्देशाने नोंदणी केली आहे. त्यामुळे कंपनीच्या प्रमाणे फी वसली करु नये असे त्यांनी म्हटले आहे.