वडेट्टीवार यांना बाळासाहेब थोरातांनी दिला सल्ला, म्हणाले की…

ओबीसी असल्यामुळे महसूल खाते मिळाले नाही, अशी खंत मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्यात बोलून दाखवली. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील खदखद पुन्हा एकदा बाहेर आल्याचं चित्र आहे. दरम्यान यावरुनच काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वडेट्टीवार यांना पुढील काळात मोठी संधी मिळेल, त्यांनी थोडी वाट पाहावी, अस सल्ला बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

  मुंबई : ओबीसी असल्यामुळे महसूल खाते मिळाले नाही, अशी खंत मदत व पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्यात बोलून दाखवली. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील खदखद पुन्हा एकदा बाहेर आल्याचं चित्र आहे.

  दरम्यान यावरुनच काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वडेट्टीवार यांना पुढील काळात मोठी संधी मिळेल, त्यांनी थोडी वाट पाहावी, अस सल्ला बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

  काय म्हणाले होते वडेट्टीवार ?

  ओबीसी म्हणून आपल्यावर अन्याय झाल्याची खंत अनेकांची आहे. मात्र, या अन्यायाला जाहीर वाचाही फोडता येत नाही. कारण, तसे झाल्यास या ओबीसी नेत्यांचे पंख पक्षात कापले जातात, असेही दुखणे आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची खंत तर जगजाहीर आहे. ‘ओबीसी नसतो, तर याहून अधिक तालेवार खाते मिळाले असते. कदाचीत ओबीसी असल्यामुळे मदत व पुनर्वसन खाते मिळाले, असे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

  आघाडीतील खदखद बाहेर

  विरोधी पक्ष नेता म्हणून काम केले, महसूल खाते मिळेल असे वाटले होते. पण कदाचित ओबीसी असल्यामुळे मदत व पुनर्वसन खाते मिळाले, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले. त्याचबरोबर, ‘वाघ हा आमच्याच इशाऱ्यावर चालतो,’ असे वक्तव्य केल्याने त्यांचा रोख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे होता का? अशी चर्चा होत आहे. यानिमित्ताने आघाडी सरकारमधील खदखद बाहेर पडली का, अशीही चर्चा आहे.

  म्हणून बाळासाहेब थोरात यांना महसूल खातं?

  विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर आता काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नाना पटोले म्हणाले, विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर यापुढील काळात अन्याय होणार नाही यांची आम्ही काळजी घेऊ. काँग्रेस पक्षात कोणतीही धुसफूस नाहीये. वरिष्ठ नेते म्हणून बाळासाहेब थोरात यांना महसूल खातं देण्यात आलं आहे.