अनिल परबांनी घेतली बाळासाहेबांची शपथ; नितेश राणेंनी मारला ट्विटरवरून टोला

मागील महिन्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमागे अनिल परब यांची मुख्य भूमिका असल्याचे माध्यमांवर दिसले होते. त्यानंतर राणेंच्या टिकेचे ते लक्ष्य राहिले आहेत.

    मुंबई, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने दुस-यांदा समन्स बजावल्यानंतर अनिल परब हजर राहिले आहेत. चौकशीला निघत असताना त्यांनी मी शिवसेनाप्रमुखांची, माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगेन की, मी काहीही चुकीचे काम केले नाही” असे म्हटले आहे. परब यांच्या या विधानावर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी व्टिट करत चित्रफित जारी केली आहे. त्यात त्यांनी “स्वर्गीय शिवसेनाप्रमुखांपेक्षा, आताच्या पक्षप्रमुखांची शप्पथ घेतली असती, तर परबांवर अजुन विश्वास बसला असता” असा राजकीय चिमटा नितेश राणेंनी घेतला आहे.

    ठाकरे बोलविते धनी असल्याचे सूचविण्याचा प्रयत्न
    मागील महिन्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमागे अनिल परब यांची मुख्य भूमिका असल्याचे माध्यमांवर दिसले होते. त्यानंतर राणेंच्या टिकेचे ते लक्ष्य राहिले आहेत. अनिल परब यांनी माध्यमांसमोर चौकशीला जाण्यापूर्वी दिलेल्या वक्तव्यांवरून आ. राणे यांनी त्यांची राजकीय खिल्ली उडवत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे त्यांचे बोलविते धनी  असल्याचे सूचविण्याचा प्रयत्न केला आहे.