बॅनर्जी, ठाकरे असो किंवा पवार, ते आडवे करणारच; निलेश राणेंचा हल्लाबोल

“पश्चिम बंगालमध्ये भाजपाची सभा. एकदा लोकांनी ठरवलं कोणाला आडवं करायचं मग आडनाव बॅनर्जी असुदे किंवा ठाकरे, पवार ते आडवे करणारच. संजय राऊत हे बघून ठेला. विसरू नका. अति तिथे माती होणारच,” असं म्हणत राणे यांनी हल्लाबोल केला आहे.

मुंबई : बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा गड खालसा करण्यासाठी भाजपाने मास्टर प्लानच बनवल्याचे दिसत आहे. यासाठी अमित शाह हे दोन दिवसांच्या बंगाल दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्या उपस्थितीत शनिवारी तृणमूल काँग्रेस व सीएएममधील ११ आमदारांनी व एका माजी खासदाराने भाजपात प्रवेश केला. निवडणूक येईपर्यंत दीदी (ममता बॅनर्जी) एकट्याच राहतील असा घणाघात अमित शाह यांनी या महाभरतीनंतर केला. यानंतर आता हाच मुद्दा पकडून भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी महाराष्ट्रातील नेत्यांवर निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत हा व्हिडीओ पश्चिम बंगालमधील भाजपाच्या एका सभेचा असल्याचा दावा केला आहे. या सभेला लोकांची मोठी गर्दी झाल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.