बँकेशी संबंधित कामे गुरुवारपर्यंत उरकून घ्या नाही तर…

शुक्रवार २५ डिसेंबरला नाताळ असल्याने बँकांना सुट्टी आहे. दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देखील बँका बंद असतील. तर, २७ डिसेंबर रोजी रविवार असल्याने बँका बंदच असतात. अशाप्रकारे या आठवड्यात सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असणार आहे.

मुंबई : गुरुवारपर्यंत बँकेशी संबंधित कामे उरकून घ्या नाही तर तुम्हाला अचणींचा सामना करावा लागू शकतो. कारण, या आठवड्यात सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत.

शुक्रवार २५ डिसेंबरला नाताळ असल्याने बँकांना सुट्टी आहे. दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देखील बँका बंद असतील. तर, २७ डिसेंबर रोजी रविवार असल्याने बँका बंदच असतात. अशाप्रकारे या आठवड्यात सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असणार आहे.

नवीन वर्ष साजरं करण्यासाठी आपण जर कुठं बाहेर गावी जाण्याचे ठरत असेल, अथवा रोखीचे व्यवहार करण्याचे नियोजन असेल तर दोन दिवसांत कामे उरकून घ्यावीत.

नव वर्ष सुरू होताच १ जानेवारीपासून बँकांच्या नियमांमध्येही काही बदल होणार आहेत. तर, ३१ डिसेंबर ही आयकर भरण्याची अंतिम तारीख आहे. यामुळे या संदर्भातील कामे पूर्ण होण्यास विलंब होऊ शकतो.