बारामती नगरपालिका होणार देशातील पहिली डिजीटल अ-वर्ग नगरपालिका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ॲपचं उद्घाटन

या अम्ब्रेला ॲपमध्ये स्थानिक शासकीय प्रशासन आणि नागरिक-केंद्री ॲप्लिकेशन्स आहेत. या अम्ब्रेला ॲपमध्ये विविध सेवांचा समावेश आहे. टेलीमेडिसिन, क्यूआर कोड आधारित मालमत्ता व्यवस्थापन, जीआयएस टॅगिंग, संपत्ती व्यवस्थापन सोल्यूशन्स, तक्रार निवारण प्रणाली, आपत्त्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधण्यासाठी नागरिक-केंद्री उपाययोजनांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

    मुंबई – नागरिक केंद्री सर्व सुविधा एका क्लिक वर उपलब्ध व्हाव्यात यासाठी तयार करण्यात आलेल्या डिजीटल बारामती अम्ब्रेला ऍपचं मंगळवारी मुंबईत विमोचन केले जाणार आहे. अंब्रेला ॲप ही एक नाविन्यपूर्ण संकल्पना असून प्रत्येक कामासाठी नागरिकांना आता वेगवेगळे मोबाईल ऍप डाऊनलोड करण्याची गरज नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांतून डिजिटल अम्ब्रेला ऍप विकसीत करण्यात आलं आहे. देशात पहिल्यांदाच अ वर्ग नगरपरिषदेमध्ये अशा प्रकराचं ॲप विकसित होत आहे. अम्ब्रेला ऍप हे नागरिकांच्या विविध गरजेच्या ॲपचा एक संग्रह आहे. या ॲपमध्ये साईन इन केल्यानंतर सर्वच ॲप साठी वन टच लॉग-ईन असून एकदाच रजिस्ट्रेशन करायचे आहे.

    या अम्ब्रेला ॲपमध्ये स्थानिक शासकीय प्रशासन आणि नागरिक-केंद्री ॲप्लिकेशन्स आहेत. या अम्ब्रेला ॲपमध्ये विविध सेवांचा समावेश आहे. टेलीमेडिसिन, क्यूआर कोड आधारित मालमत्ता व्यवस्थापन, जीआयएस टॅगिंग, संपत्ती व्यवस्थापन सोल्यूशन्स, तक्रार निवारण प्रणाली, आपत्त्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधण्यासाठी नागरिक-केंद्री उपाययोजनांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या सर्व सुविधांसाठी आता बारामतीकरांना फक्त एकच अम्ब्रेला ऍप डाउनलोड करावं लागणार आहे.

    स्टेट ऑफ आर्ट स्वरूपाची टेक्नॉलॉजी वापरून तयार करण्यात आलेल्या या ॲपच्या साह्याने आरोग्य व्यवस्थेवरचा ताण कमी करून त्याची गुणवत्ता वाढवणे, नागरिकांच्या तक्रारींचा-सूचनांचा कालबद्ध स्वरूपात आढावा आणि निपटारा करणे, नागरिकांना आर्थिक साक्षर करत असतानाच ॲपच्या मदतीने आर्थिक नियोजन आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी मदत करणे, क्लिष्ट अशा मालमत्ता व्यवस्थापनासाठी मदत करणे, टेलिमेडीसीन-हेल्थ किऑस्क च्या माध्यमातून आरोग्याचा स्तर वाढवणे, आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत उपलब्ध करून देणे अशा विविध उद्दीष्टांसह नागरिकांचे जीवनमान उचावण्याच्या प्रयत्न करण्यात आलेला आहे.

    कौस्तुभ बुटाला यांच्या मार्गदर्शनाखाली या ॲपची निर्मिती आणि अंमलबजावणी अत्यंत कमी वेळात करण्यात आली आहे. या ॲपचं आज मंगळवारी मुंबईच्या सह्याद्री राज्य अतिथीगृहात लाँचींग करण्यात आलं. या कार्यक्रमाला राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार तसंच बारामतीच्या नगराध्यक्षा पूर्णिमा तावरे यांच्यासह बँकींग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.