सावधान! अधिवेशनात जावून आलेल्यांसह, लग्न समारंभात, मंत्रालयात समूह संसर्गाचा शिरकाव; दोन पोलिस आणि लिपिक, पत्रकार ओमिक्रॉन बाधित?

ओमायक्रॉन कोरोना व्हेरीयंटचा झापट्याने समूह संसर्ग होत असल्याचे सांगण्यात येत आहे. याचा अनुभव गेल्या पाच दिवसांपासून अधिवेशनासाठी आलेल्या अनेकांना येवू लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वाना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे(Be careful! Infiltration of communal contagion in the ministry, including those attending conventions, at wedding ceremonies; Two policemen and a clerk, journalist obstructed Omicron?).  

    मुंबई : ओमायक्रॉन कोरोना व्हेरीयंटचा झापट्याने समूह संसर्ग होत असल्याचे सांगण्यात येत आहे. याचा अनुभव गेल्या पाच दिवसांपासून अधिवेशनासाठी आलेल्या अनेकांना येवू लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सर्वाना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे(Be careful! Infiltration of communal contagion in the ministry, including those attending conventions, at wedding ceremonies; Two policemen and a clerk, journalist obstructed Omicron?).

    संसर्गाचा वेग पाहता चाचणीचा अहवाल येण्यास विलंब

    अधिवेशनात आलेल्या आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट  झाले आहे त्यानंतर त्यांच्या संपर्कात आल्या भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे. नेत्यांच्या लग्नात  उपस्थिती लावणा-या राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि त्यांचेपती सदानंद सुळे याना देखील कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर आता मंत्रालयातही ओमिक्रॉनचा शिरकाव झाला आहे.

    मंत्रालयातील दोन पोलिस आणि एका लिपीकासह काही पत्रकारांनादेखील कोरोनाची अंशत्: लक्षणे आढळून आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे  हा ओमिक्रॉन संसर्ग आहे किंवा नाही याबाबत तपासणी करून घेण्चा सल्ला त्यांना देण्यात आला आहे. दरम्यान याबाबत चाचणीचा अहवाल येण्यास विलंब लागत असून संसर्गाचा वेग पाहता जिनोम सिक्वेसिंग चा अहवाला आल्यानंतरच  हे सर्व जण कोरोनाच्या कोणत्या प्रकारच्या संसर्गाचे बळी आहेत ते समोर येणार आहे असे सांगण्यात आले.