आज सोमवारी सकाळी महापौर निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत पेडणेकर यांनी चित्रपट दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीत सहभागी असलेल्या मंत्र्याचे नाव जाहीर करण्याचे आव्हान शेलार यांना दिले. त्या म्हणाल्या की, शेलार हे सातत्याने माध्यमांसमोर येऊन शिवसेनेवर बिनबुडाचे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे कोणताही मुद्दा शिल्लक नाही. शेलार आमदार झाले असले तरी त्यांना महापालिकेचा मोह सोडता आलेला नाही. त्यांचा आत्मा महापालिकेतच भटकत राहतो. तुम्हाला पक्षाने खोटे बोलायला शिकवलय का? असा सवाल देखील महापौर पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.
भाजप नेते आशिष शेलार आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यात सुरू झालेला वाद थांबत नाहीये. शेलार यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करणाऱ्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आता करण जोहर पार्टी प्रकरणात शेलार यांना आव्हान दिले असून, त्यांनी आरोप सिद्ध करावे अन्यथा माफी मागावी. बिनबुडाचे आरोप शिवसेना खपवून घेणार नाही. असा थेट इशारा दिला आहे.
अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेत्री अमृता अरोरा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर निर्माता दिग्दर्शक करण जोहरने आयोजित केलेली पार्टी चांगलीच चर्चेत आली आहे. या पार्टीला राज्य मंत्री मंडळातील मंत्री उपस्थित होते. असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला होता. आशिष शेलार यांच्या या आरोपाला मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आव्हान दिले आहे.
आज सोमवारी सकाळी महापौर निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत पेडणेकर यांनी चित्रपट दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीत सहभागी असलेल्या मंत्र्याचे नाव जाहीर करण्याचे आव्हान शेलार यांना दिले. त्या म्हणाल्या की, शेलार हे सातत्याने माध्यमांसमोर येऊन शिवसेनेवर बिनबुडाचे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे कोणताही मुद्दा शिल्लक नाही. शेलार आमदार झाले असले तरी त्यांना महापालिकेचा मोह सोडता आलेला नाही. त्यांचा आत्मा महापालिकेतच भटकत राहतो. तुम्हाला पक्षाने खोटे बोलायला शिकवलय का? असा सवाल देखील महापौर पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.
महापौर पेडणेकर म्हणाल्या की, भाजपचा आपल्याच नगरसेवकांवर विश्वास नाही. त्यामुळे भाजपचे मोठ्या संख्येने नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. आजही शेलार यांच्या सभेला एकही नगरसेवक नाही. विश्वासात न घेतल्याने नगरसेवक संतप्त असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला आहे.