Best's fleet will include state-of-the-art double decker buses; Sophisticated facilities with two doors, two stairs, CCTV cameras

दक्षिण मुंबईमध्ये पर्यटक आणि मुंबईकर जनतेसाठी ३ नोव्हेंबर २०२१ पासून खुल्या दुमजली बसगाडीतून पर्यटन सेवेचा शुभारंभ करण्यात आला. सुरुवातीला सायंकाळी ६.३० आणि रात्री ८.०० वाजता गेट वे ऑफ इंडिया येथून दोन बसफेऱ्या शनिवार आणि रविवार यादिवशी करण्यात येत होत्या.परंतु, प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद लक्षात घेऊन नरिमन पॉईंट येथून दुपारी ३.०० आणि सायंकाळी ५.०० वाजता दोन अतिरिक्त बसफेऱ्या नरिमन पॉईंट येथून सुरु करण्यात आल्या आहेत(BEST has extended two rounds of double decker buses due to the response of passengers to the Mumbai tourism service).

    मुंबई : दक्षिण मुंबईमध्ये पर्यटक आणि मुंबईकर जनतेसाठी ३ नोव्हेंबर २०२१ पासून खुल्या दुमजली बसगाडीतून पर्यटन सेवेचा शुभारंभ करण्यात आला. सुरुवातीला सायंकाळी ६.३० आणि रात्री ८.०० वाजता गेट वे ऑफ इंडिया येथून दोन बसफेऱ्या शनिवार आणि रविवार यादिवशी करण्यात येत होत्या.परंतु, प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद लक्षात घेऊन नरिमन पॉईंट येथून दुपारी ३.०० आणि सायंकाळी ५.०० वाजता दोन अतिरिक्त
    बसफेऱ्या नरिमन पॉईंट येथून सुरु करण्यात आल्या आहेत(BEST has extended two rounds of double decker buses due to the response of passengers to the Mumbai tourism service).

    दररोज सरासरी २०० पर्यटक आणि मुंबईकर या पर्यटन बससेवेचा लाभ घेत आहेत.अशा प्रकारे या पर्यटन बससेवेला प्रवाशांचा मिळालेला वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन केवळ सोमवार ते शुक्रवार या दरम्यान वाढविण्यात आलेली ही बससेवा प्रवाशांच्या मागणीनुसार आणि सोयीसाठी शनिवार २७.११.२०२१ पासून फक्त शनिवार आणि रविवार या दिवशी सकाळी ० ९ .३० आणि ११.०० वाजता दोन अतिरिक्त बसफेऱ्या बेस्ट उपक्रमामार्फत चालविण्यात येणार आहेत.

    या बससेवा दररोज दुपारी ३.०० आणि सायंकाळी ५.०० वाजता नरिमन पॉईंट येथून तर सायंकाळी ६.३० ते रात्री ८.०० वाजता गेट वे आॅफ इंडिया येथून कार्यरत आहे. पर्यटकांना तिकीट विक्रीसाठी तसेच अन्य माहितीकरता डॉ . शामाप्रसाद मुखर्जी चौक याठिकाणी संपर्क साधता येईल त्याशिवाय बेस्ट उपक्रमाचा टोल फ्री क्रमांक १८०० २२७ ५५० आणि ०२२२४१ ९ ०११७ या दूरध्वनी क्रमांकावर देखील या पर्यटनसेवेविषयी माहिती मिळू शकेल.दादर तिकीट बुक माय शॉे अ‍ॅपवर सुध्दा उपलब्ध आहे.सर्व मुंबईकरांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन बेस्टतर्फे करण्यात आले आहे.