कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर बेस्टचा एकदम बेस्ट निर्णय – दोन डोस न घेतलेल्या बसचालकांना बस चालवण्यास मनाई

कोरोना रुग्णसंख्या वाढल्यामुळे रेल्वेप्रमाणे बेस्टने देखील लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांनाच (Double Vaccination Of Passengers) प्रवासाची मुभा दिली आहे. त्याप्रमाणे आता दोन डोस न घेतलेल्या चालकांना बस चालवण्यास मनाई (Drivers Without Two Vaccine Dose Prohibited From Dirivng Best Bus) करण्यात आली आहे.

    मुंबई : मुंबईत (Mumbai) सध्या कोरोनाचे रुग्ण गेल्या दोन दिवसात कमी होत असले तरीही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या  (Corona Third Wave) झपाट्याने वाढल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण अजूनही पसरले आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढल्यामुळे रेल्वेप्रमाणे बेस्टने देखील लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची मुभा दिली आहे. त्याप्रमाणे आता दोन डोस न घेतलेल्या चालकांना बस चालवण्यास मनाई (Drivers Without Two Vaccine Dose Prohibited From Dirivng Best Bus) करण्यात आली आहे.

    बेस्ट ही मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असून रोज २८ ते ३० लाख प्रवासी प्रवास करतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही लॉकडाऊनमध्ये रेल्वेने सर्वसामान्य नागरिकांना प्रवास बंद केला. त्यानंतर बेस्टने मुंबई आणि मुंबईच्या बाहेरही जनतेला सेवा दिली होती. यावेळी लस न घेतलेल्या नागरिकांना बेस्टचा मोठा आधार होता. मात्र आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बेस्ट उपक्रमाकडून देखील नियम कडक करण्यात आले आहेत.

    काही दिवसांपासून बेस्ट उपक्रमाने बेस्ट बस आगारातील प्रवाशांच्या युनिवर्सल पासची तपासणी सुरु केली आहे. दोन डोस झालेल्या प्रवाशांनाच केवळ बेस्टने बसने प्रवास करता येणार आहे मात्र आता प्रवाशांसोबत चालकीही लसीचे दोन डोस घेतलेला असला पाहिजे, ज्या बस चालकाचे लसीचे दोन डोस झालेले नाहीत. अशा चालकाला बस चालवण्यास मनाई करण्यात आली आहे. तर केवळ बस चालकच नव्हे तर वाहक, तिकीट तपासनीस व इतर कर्मचारी अशा सर्वांनीच दोन डोस घेणे बेस्ट प्रशासनाने बंधनकारक केले आहे.