
बेस्ट उपक्रमाचा बस पास आणि दैनंदिन तिकिटामध्ये बचत करणारी योजना आणली आहे. त्यानुसार ७२ प्रकारच्या विविध नव्या योजनांमधून प्रवासी आपल्याला हव्या असलेल्या फेरीची निवड करू शकणार आहेत('BEST' scheme to save money of Mumbaikars; 72 types of different schemes, facility to select rounds according to preference).
मुंबई : बेस्ट उपक्रमाचा बस पास आणि दैनंदिन तिकिटामध्ये बचत करणारी योजना आणली आहे. त्यानुसार ७२ प्रकारच्या विविध नव्या योजनांमधून प्रवासी आपल्याला हव्या असलेल्या फेरीची निवड करू शकणार आहेत(‘BEST’ scheme to save money of Mumbaikars; 72 types of different schemes, facility to select rounds according to preference).
मुंबईची जीवन वाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या बस गाडयांमधून दररोज सुमारे ३० लाख प्रवाशी प्रवास करत असतात, तर अनेकांना कामानिमित्त दिवसातून अनेकवेळा बसमधून प्रवास करावा लागतो. अशा प्रवाशांसाठी बेस्ट उपक्रमाने काही वर्षांपूर्वी मॅजिक पास म्हणजे एका दिवसात ४० रुपयांच्या तिकिटावर कुठेही प्रवास करण्याची मुभा ठेवली होती.
मात्र, बेस्ट उपक्रम आता प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एकात्मिक तिकीट प्रणाली) आणि मोबाईल अॅप सुविधा आणणार आहेत. हे कार्ड घेतानाच प्रवाशांना एक मोबाईल अॅप डाऊनलोड करुन कार्डला मोबाईल अॅपची जोड दिली जाईल. त्याद्वारेच या योजनेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे.
विना वातानुकूलित आणि वातानुकूलित बस प्रवाशांना ही सुविधा मिळणार आहे. या योजनेनुसार दोन आठवडे, चार आठवडे आणि दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फेऱ्या, दिवस यावर आधारित निवडक भाडे टप्प्यात प्रवास करता येणार आहे.