Don't go for ST strike! There is no settlement on Monday either; The High Court directed the organization to present its position before the three-member committee

एसटीची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली असून, आता योग्य त्या उपाययोजना न केल्यास भविष्यात महामंडळाला कुलुप लावावे लागेल, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचे अधिकारी खासगीत सांगतात. काेराेनामुळे प्रवासी संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने एसटीच्या दरराेजच्या महसुलात घट हाेत आहे.

  मुंबई : एसटीची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली असून, आता योग्य त्या उपाययोजना न केल्यास भविष्यात महामंडळाला कुलुप लावावे लागेल, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचे अधिकारी खासगीत सांगतात. काेराेनामुळे प्रवासी संख्या दिवसेंदिवस घटत असल्याने एसटीच्या दरराेजच्या महसुलात घट हाेत आहे.

  परिणामी, एसटी महामंडळाचे नित्याचे खर्च चालविणे देखील अवघड झाले आहे. एसटी महामंडळाला दरराेज नव-नवीन समस्यांना ताेंड द्यावे लागत असताना, आता एसटी महामंडळासमाेर एक नवीन संकट आ वासून उभं आहे. एसटीच्या ताफ्यातील सुमारे दाेन ते अडीच हजार बसेस या येत्या तीन ते चार महिन्यात प्रवासी वाहतुकीसाठी अयाेग ठरणार आहेत. यामुळे येत्या काही महिन्यात दैनंदिन सुमारे ६०-६५ लाख प्रवाशांना सेवा देण्यात अडचण निर्माण हाेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

  काेराेना काळापूर्वीच एसटी महामंडळाला आर्थिक संकटाला सामाेरे जावे लागत हाेते, त्यातच काेराेना महामारीमुळे एसटीची प्रवासी वाहतुक पूर्णपणे बंद झाली. ज्यामुळे एसटीचा आर्थिक डाेलारा डगमगला आहे. नित्याच्या विविध संकटाबराेबरच आता एसटीच्या ताफ्यातील दाेन ते अडीच हजार बसेस पुढील तीन ते चार महिन्यात स्क्रॅप मध्ये जाणार असल्याचे अधिकारी सांगतात. ज्यामुळे सुमारे ६० ते ६५ लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यामध्ये अडचण निर्माण हाेवू शकते, महसूलामध्ये घट निर्माण हाेईल असे बाेलले जात आहे.

  पुढील काही दिवसात शाळा-महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास एसटीच्या वाहतुकीवर याचा प्रचंड ताण येणार असून, पर्याप्त बस संख्येमध्ये या सर्वांना सुविधा पुरवणे एसटीला अवघड जाणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ज्यामुळे महामंडळाने त्वरीत उपाययाेजना न केल्यास गंभीर परिस्थिती निर्माण हाेण्याची शक्यता वरिष्ठ अधिकारी व्यक्त करत आहेत.

  भविष्यात हाेणाऱ्या तिकीट दरामुळे प्रवासी संख्येवर विपरीत परिणाम !

  तिकीट विक्रीतून येणारा महसुल हा एसटीच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. भविष्यात तिकीट दरात झालेली वाढ एसटीच्या प्रवासी संख्या वर विपरीत परिणाम घडून आणू शकते. त्यामुळे इंधन दरवाढीचा फटका सहन करत एसटी समोर अतिरिक्त दरवाढ न करता प्रवासी सेवा सुविधा पुरवणे, हे मोठे आव्हान ठरणार आहे. सध्या एसटीने सुमारे १७ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य शासनाच्या परिवहन प्राधिकरणाकडे सादर केला आहे. भविष्यात एसटीची केव्हाही भाडे वाढ होऊ शकते. पण यामुळे महसुलामध्ये इतका परिणाम होणार नाही. उलटपक्षी प्रवासी संख्या कमी झाल्यास महसूल आहे त्यापेक्षा कमी होणे शक्य आहे.