राज्य सरकारचा मोठा निर्णय; महिला पोलिसांच्या ड्यूटीच्या तासांमध्ये केला बदल

राज्य सरकारने महिला पोलिसांच्या ड्युटीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महिला पोलिसांची ड्युटी 12 तासांवरून 8 तासांची करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडे यांनी माहिती दिला आहे.

    मुंबई : राज्य सरकारने महिला पोलिसांच्या ड्युटीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महिला पोलिसांची ड्युटी 12 तासांवरून 8 तासांची करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडे यांनी माहिती दिला आहे.

    महिला पोलीस कर्मचाऱ्यांना काम आणि घरगुती कामाची पाहणी जबाबदारी पाहता त्यांच्या कामाच्या तासामध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सण उत्सव म्हटलं की पोलिसांना बारा- बारा तास काम करावं लागतं. त्यामुळे ड्युटीमधील तास कमी करण्याचा विचार सुरू होता, असं संजय पांडे यांनी सांगितलं.