udhav thackrey

एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. शैक्षणिक प्रवेश आणि सेवाभरतीसाठी याचा लाभ होणार आहे. त्यानुसार मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा (EWS) लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गाच्या (SEBC) आरक्षणपासून वंचित असलेल्या मराठा समाजाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई : मराठा समाजाला मोठा दिलासा देणारा निर्णय महाविकासआघाडी सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत फायदा होणार आहे. आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजाची नाराजी दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. शैक्षणिक प्रवेश आणि सेवाभरतीसाठी याचा लाभ होणार आहे.

त्यानुसार मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणाचा (EWS) लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गाच्या (SEBC) आरक्षणपासून वंचित असलेल्या मराठा समाजाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मात्र, एसईबीसी आरक्षणासाठी आग्रही असलेले मराठा आंदोलक या निर्णयावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. मंत्री मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.