cm

  • चाकरमान्यांसाठी एसटी बसेस सोडल्या जाणार आहेत. या एसटी बसेस बुकींग प्रमाणे सोडण्यात येणार होत्या. मंगळवार ४ ऑगस्टपासून संध्याकाळ ६ वाजल्यापासून एसटीसाठी बुकिंग सुरु होणार आहे. चाकरमान्यांना प्रवासादरम्यान कुठेही खायला भेटणार नाही.

मुंबई : मुंबईत कोरोनाता प्रकोप वाढला आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना परवानगी मिळणार की नाही याबाबत नागरिकांना उत्सुकता लागली होती. परंतु राज्य सरकारने चाकरमान्यांना दिलासा दिला आहे. राज्य सरकारने चाकरमान्यांच्या बाजूने विचार करत गावी जाण्याची परवानगी दिली आहे. मात्र काही नियम पाळणे बंधनकारक केले आहे. अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. 

गणेशोत्सव जवळ आल्याने कोकणातील चाकरमान्यांना गावाकडे जाण्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे सर्व चाकरमान्यांचे लक्ष सरकारच्या निर्णयाकडे लागले होते. परंतु सरकारने चांगला निर्णय घेऊन चाकरमान्यांना दिलासा दिला आहे. आज परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी जाण्याचा मार्ग मोकळा केला आहे. चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी सात हजार गाड्यांचं नियोजन करण्यात आलं आहे. तसेच क्वारंटाइनचा कालावधी हा १० दिवसांचा करण्यात आला आहे. 

चाकरमान्यांसाठी एसटी बसेस सोडल्या जाणार आहेत. या एसटी बसेस बुकींग प्रमाणे सोडण्यात येणार होत्या. मंगळवार ४ ऑगस्टपासून संध्याकाळ ६ वाजल्यापासून एसटीसाठी बुकिंग सुरु होणार आहे. चाकरमान्यांना प्रवासादरम्यान कुठेही खायला भेटणार नाही. तसेच कुठेही जेवण्यांस एसटी थांबवणार नाही. स्वतःचे जेवण स्वतः घरुन घेऊन जावे लागणार आहे. एका बसमध्ये २२ प्रवाशांना परवानगी दिली आहे. तसेच फक्त २ वेळा बस थांबविण्यात येणार आहे. खासगी बस चालकांना एस.टी. पेक्षी दीड पटच दर आकारता येणार आहे. नाहीतर कारवाई केली जाणार. १० दिवसांचा क्वारंटाईन काळ असल्यामुळे १२ ऑगस्टपूर्वी कोकणात पोहचावं लागेल. १२ तारखेला पोहचल्यास रात्री १२ पर्यंत क्वारंटाईन होतील. ज्यांना १२ तारखेनंतर जायच असेल त्यांना ४८ तासांत पूर्वी कोविड चाचणी करावी लागेत आणि ती निगेटीव्ह आली तरच त्यांना कोकणात जावं असा नियम तयार करण्यात आला आहे.