म्हाडा पेपरफूट प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला मोठा पुरावा; आता कोडवर्ड करणार सगळ्याचा उलगडा

गेल्या शनिवारी मध्यरात्री म्हाडाची भरती परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले होते. या पेपरफुटीचे कनेक्शन औरंगाबादमध्ये असून तेथेही पोलिसांनी तपास सुरू केला असतानाच आता पेपर मिळविण्यासाठी आरोपींनी कोडवर्डचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. यानंतर आता सायबर पोलिसांकडून फोन करणाऱ्यांची चौकशी होणार आहे. दुसरीकडे,स आरोपींच्या शोधासाठी सायबर सेलची पथकं वेगवेगळ्या शहरात दाखल झाली आहेत(Big evidence found in MHADA Paperfoot case; Now the codeword will explain everything).

    मुंबई :  गेल्या शनिवारी मध्यरात्री म्हाडाची भरती परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले होते. या पेपरफुटीचे कनेक्शन औरंगाबादमध्ये असून तेथेही पोलिसांनी तपास सुरू केला असतानाच आता पेपर मिळविण्यासाठी आरोपींनी कोडवर्डचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. यानंतर आता सायबर पोलिसांकडून फोन करणाऱ्यांची चौकशी होणार आहे. दुसरीकडे,स आरोपींच्या शोधासाठी सायबर सेलची पथकं वेगवेगळ्या शहरात दाखल झाली आहेत(Big evidence found in MHADA Paperfoot case; Now the codeword will explain everything).

    फोन करणाऱ्यांचा शोध सुरू

    आरोपींना फोनवरून कोडवर्डच्या माध्यमातून म्हाडाचे पेपर मागण्यात आलेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. आरोपींना कोणीकोणी फोन केला त्यांची माहिती काढून त्यांची चौकशी सायबर सेलतर्फे करण्यात येणार आहे.

    टीईटी, पोलिस भरती परीक्षेवरही संशय

    म्हाडाच्या पेपरफुटीनंतर आता टीईटी आणि पोलिस भरती परीक्षेवरही संशयाचे सावट आहे. आरोग्य विभाग पेपर फुटीमध्ये अटक केलेला मुंबई नेव्हल डॉकयार्डमधील खलाशी प्रकाश मिसाळ हा पेपर फोडणाऱ्या एजंटांशी संपर्कात असून हे एजंट टीईटी परीक्षा (शिक्षक पात्रता परिक्षा), पोलिस भरती परीक्षा ई परीक्षांचे फुटलेले पेपर मिळविणाऱ्यांशी संपर्कात होते असे तपासात समोर आले आहे. आरोग्य विभाग गट डचा पेपरव्यतिरिक्त अन्य कोणकोणत्या परीक्षांचे फुटलेले पेपर मिळवून ते परीक्षार्थीमध्ये वितरित केले आहेत, याचा तपास सायबर पोलिसांनी सुरू केला आहे.

    खलाशी प्रकाश मिसाळ, सहसंचालक महेश बोटले, परीक्षार्थी नामदेव करांडे आणि उमेश मोहिते अशी आरोपींची नावे असून ते 18 पर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत.मिसाळ हा एजंट विशाल गोसावी, नागरगोजे, जायभाय व बुढे यांच्या संपर्कात होता. हे एजंट टीईटी परिक्षा, पोलीस भरती परीक्षा ई परीक्षांचे फुटलेले पेपर मिळविणाऱ्यांशी संपर्कात होते, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

    दोन एजंट फरारच

    नागरगोजे याला राजेंद्र सानप याच्याकडून गट डचा पेपर मिळाला होता. तो त्याने पिंपरी चिंचवडमधील दोघा एजंटांना पुढे दिला होता. हे दोन्ही एजंट अद्याप फरार आहेत.