मोठी बातमी! रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज Mega Block नाही; टेन्शन न घेता करा विनासायास प्रवास

दर रविवारी मेगाब्लॉक (Mega Block) आणि जम्बोब्लॉक (Jumbo Block) घेतल्याने प्रवास करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आणि त्यांचे फारच हाल होतात.

    मुंबई : मध्य रेल्वेच्या (Central Railway) दोन्ही मार्गांवर देखभाल आणि दुरूस्तीच्या कामांसाठी (Maintenance And Repair Work) दर रविवारी (Sunday) मेगाब्लॉक (Mega Block) तसेच पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावर  मुंबई विभागात (Mumbai Division) जम्बोब्लॉक (Jumbo Block) घेण्यात येतो. आजच्या रविवारी दोन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक आणि जम्बोब्लॉक घेण्यात येणार नाही असे दोन्ही रेल्वे कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

    दर रविवारी मेगाब्लॉक आणि जम्बोब्लॉक घेतल्याने प्रवास करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो आणि त्यांचे फारच हाल होतात. आजचा दिवस असा आहे की, खूप दिवसांनंतर दोन्ही रेल्वेंनी मेगाब्लॉक तसेच जम्बोब्लॉक न घेण्याचे जाहीर केल्याने प्रवाशांना आज प्रवास करताना विनासायास प्रवास करता येणार आहे.