Mumbai Police's 'Operation All Out' - Combing operation in the city

मुंबईत समूह संसर्ग वाढत असून मुंबई तिस-या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याचे भाकीत राज्य कोविड-१९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ शशांक जोशी यानी केले आहे. त्यामुळे नव वर्षाच्या कार्यक्रमांच्या पार्श्वभुमीवर मुंबई पोलिसांकडून जमावबंदी (कलम १४४) ७ जानेवारी २०२२ पर्यंत लागू राहणार आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे(Police take big decision as number of patients is increasing in Mumbai; A curfew has been imposed till January 7). 

  मुंबई : मुंबईत समूह संसर्ग वाढत असून मुंबई तिस-या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याचे भाकीत राज्य कोविड-१९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ शशांक जोशी यानी केले आहे. त्यामुळे नव वर्षाच्या कार्यक्रमांच्या पार्श्वभुमीवर मुंबई पोलिसांकडून जमावबंदी (कलम १४४) ७ जानेवारी २०२२ पर्यंत लागू राहणार आहे. ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे(Police take big decision as number of patients is increasing in Mumbai; A curfew has been imposed till January 7).

  १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र

  ३० डिसेंबर२०२१ च्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून ७ जानेवारीच्या रात्री बारा वाजेपर्यंत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व जागी हे आदेश लागू असतील, असे याबाबतच्या आदेशात म्हटले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असेल.

  याशिवाय महामारी कायदा १८९७ आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि इतर कायदेशीर तरतुदींखालील कारवाई केली जाईल, असेही त्यात म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी त्यापूर्वी ३१ डिसेंबर पर्यंत मुंबईमध्ये जमावबंदी घोषित केली होती आता हा कालावधी वाढवून सात जानेवारीपर्यंत मुंबईमध्ये जमाव बंदी लावण्यात आली आहे. ज्यामुळे आता पाच पेक्षा अधिक लोक जमू शकणार नाहीत. तसेच मुंबईमध्ये होणारी सार्वजनिक कार्यक्रम सभा यासाठी सुद्धा शासनाकडून नियम आणि अटी शर्ती घालण्यात आले आहेत.

  ३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी गर्दी होऊ नये म्हणून आम्ही १४४ कलम लागू केले आहे. लोकांनी गर्दी करु नये यासाठी पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. कोरोना केसेस वाढत चालल्या असल्याने आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या परिवारासोबत आपण नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करावे. यावेळी आम्ही कुठल्याही मोठ्या पार्ट्यांना परवानगी दिली नाही. नियमांचे उल्लंघन करताना आढळून येईल त्या आयोजकांवर कारवाई केली जाईल,

  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील