Biggest pay rise in ST's history! Will ST workers call off strike? Gopichand Padalkar and Sadabhau Khot will announce

एसटीच्या इतिहासातली सर्वात मोठी पगारवाढ सरकारने केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पाच हजारांची वाढ करत महागाई भत्ता शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्याचा निर्णय जाहीर करताना 14 दिवस सुरु असलेला संप मागे घेण्याचं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. मात्र, एस.टी कर्मचारी विलणीकरणावर ठाम आहेत. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन संप मागे घेणार की नाही? याची घोषणा करणार आहेत(Biggest pay rise in ST's history! Will ST workers call off strike? Gopichand Padalkar and Sadabhau Khot will announce ).

    मुंबई : एसटीच्या इतिहासातली सर्वात मोठी पगारवाढ सरकारने केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पाच हजारांची वाढ करत महागाई भत्ता शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्याचा निर्णय जाहीर करताना 14 दिवस सुरु असलेला संप मागे घेण्याचं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. मात्र, एस.टी कर्मचारी विलणीकरणावर ठाम आहेत. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन संप मागे घेणार की नाही? याची घोषणा करणार आहेत(Biggest pay rise in ST’s history! Will ST workers call off strike? Gopichand Padalkar and Sadabhau Khot will announce ).

    पगारवाढीसह निलंबन मागे घेणार, सेवा समाप्ती मागे घेणार अशी घोषणा अनिल परब यांनी केलीय. सर्व कामगारांनी संप मागे घ्यावा. उद्या सकाळी 8 वाजता कामावर हजर रहा असे आवाहन अनिल परब यांनी केले आहे.

    परिवहन मंत्र्यांच्या घोषणे नंतर देखील एसटी कर्मचा-यांचा आंदोलन मागे घेण्यास नकार आहे. पगारवाढीचे गाजर नको विलीनीकरण हवं असे कर्मचारी म्हणाले. ही वेतनवाढ आम्हाला अजिबात मान्य नाही. सर्व कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहे. विलिनीकरण झालं तर जनतेलाही फायदा होणार आहे. बसच्या तिकिटात 40 टक्के कमी होईल असा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे.

    आंदोलन हे रबरासारखं असतं, जास्त ताणल्यास तुटतं अशी सूचक प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी परिवहन मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी दिली होती. अनिल परब यांच्या पत्रकार परिषदेनंतर गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन संप मागे घेण्याबाबतचा निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगीतले.