दहा लाखांचा सौदा आणि परीक्षार्थींना उत्तरपत्रिका कोऱ्या ठेवण्याचा सल्ला; म्हाडा पेपर फूटी प्रकरणात धक्कादायक खुलासा

आरोग्य भरती पेपरफुटीपाठोपाठ म्हाडच्याही पेपर फुटी प्रकरणाने राजकीय वातावरण तप्त असतानाच पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी धक्कादायक खुलासे केले आहेत. या पेपरफुटीमागे राज्यात कोट्यवधींचे रॅकेट असल्याचेही समोर आले आहे. एजंट्सद्वारे आलेल्या परीक्षार्थांनी उत्तीर्ण करण्यासाठी मुख्य आरोपीने अफलातून ‘प्लॅनिंग’ केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे(Billions of rackets behind MHADA Paper leak). या प्रकरणातील आरोपीला परीक्षार्थींकडून प्रत्येकी 10 लाख रुपये मि‌ळणार होते. तसेच राज्यातील कित्येक एजंट्सही या प्रकरणात सक्रीय असून त्यापैकी केवळ 10 जणांचीच नावे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

  मुंबई : आरोग्य भरती पेपरफुटीपाठोपाठ म्हाडच्याही पेपर फुटी प्रकरणाने राजकीय वातावरण तप्त असतानाच पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी धक्कादायक खुलासे केले आहेत. या पेपरफुटीमागे राज्यात कोट्यवधींचे रॅकेट असल्याचेही समोर आले आहे. एजंट्सद्वारे आलेल्या परीक्षार्थांनी उत्तीर्ण करण्यासाठी मुख्य आरोपीने अफलातून ‘प्लॅनिंग’ केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे(Billions of rackets behind MHADA Paper leak). या प्रकरणातील आरोपीला परीक्षार्थींकडून प्रत्येकी 10 लाख रुपये मि‌ळणार होते. तसेच राज्यातील कित्येक एजंट्सही या प्रकरणात सक्रीय असून त्यापैकी केवळ 10 जणांचीच नावे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

  तरीही धाडस…

  आरोग्य भरती पेपरफुटीचे प्रकरण गाजत असतानाही जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक आणि मुख्य सूत्रधार डॉ. प्रीतीश देशमुखने म्हाडाचा पेपर फोडण्याचे धाडस केले. यासाठी त्याने सुपीक योजनाही आखली होती. एजंट्सद्वारे म्हाडाच्या परीक्षेत बसणाऱ्या परीक्षार्थींना त्याने उत्तरपत्रिका कोरीच ठेवण्याचा सल्ला दिला होता, असे तपासात समोर आले आहे. तपासणीवेळी या परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिकेत थेट गुण देऊन उत्तीर्ण करण्याची त्याची योजना होती. मात्र, पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांमुळे त्याचा डाव उधळला गेला.

  प्रत्येकी 10 लाखांची डील

  हाडाची लेखी परीक्षा आयोजित करून त्याच्या निकालापर्यंत सर्व कामाचे कंत्राट पुण्यातील जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आले होते. या गोष्टीचा गैरफायदा घेत देशमुख याने राज्यभरातील एजंट्सशी संपर्क साधून गुण वाढवून देण्याच्या मोबदल्यात प्रत्येकी 10 लाखांची डील केली होती. त्यावरील रक्कम एजंट स्वीकारणार होते. आगाऊ पैसे देणाऱ्या परीक्षार्थींना उत्तरपत्रिका चक्क कोऱ्या ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता.
  परीक्षा झाल्यानंतर संबंधित उत्तरपत्रिका आरोपी देशमुख याच्या जी. एस. सॉफ्टवेअर कंपनीच्या ताब्यात देण्यात येणार होत्या.

  10 एजंटचा शोध सुरू

  राज्यभरातील 10 एजंट पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत. पुणे सायबर पोलिसांना राज्यातील 10 एजंट्सची माहिती मिळाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस उपायुक्त भाग्यश्री नवटके मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडू हाके, अंकुश चिंतामण, कुमार घाडगे, मीनल पाटील आणि अनिल डफळ करीत आहेत.