BMC

महानगरपालिकेने सोशल मीडियावर त्यांचा पीआर हाताळण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्यासाठी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सुमारे दीड वर्षापूर्वी तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी पीआर हाताळण्यासाठी राम दोतोंडे यांची नियुक्ती ही केली होती. ते अद्याप कार्यरत असून त्यांना दरमहा सुमारे दीड लाख रुपये मोबदला म्हणून देण्यात येत आहेत. शिवाय त्यांचे कार्यालय, कर्मचारीवर्ग आणि इत्तर सेवा सुविधांचा खर्च वेगळा.

    मुंबई : पालिकेची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी दुसऱ्या पीआर एजन्सीसाठी निविदा आमंत्रित केली आहे. पालिकेचा जनसंपर्क विभाग असताना खाजगी एजन्सीवर कोट्यावधी रुपयांच्या उधळपट्टीला भाजपाने कडाडून विरोध केला आहे.

    अलीकडेच, महानगरपालिकेने सोशल मीडियावर त्यांचा पीआर हाताळण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्यासाठी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सुमारे दीड वर्षापूर्वी तत्कालीन आयुक्त अजोय मेहता यांनी पीआर हाताळण्यासाठी राम दोतोंडे यांची नियुक्ती ही केली होती. ते अद्याप कार्यरत असून त्यांना दरमहा सुमारे दीड लाख रुपये मोबदला म्हणून देण्यात येत आहेत. शिवाय त्यांचे कार्यालय, कर्मचारीवर्ग आणि इत्तर सेवा सुविधांचा खर्च वेगळा.

    आता या नवीन निविदेमुळे हे स्पष्ट झाले आहे की पुन्हा त्याच कामासाठी महानगरपालिका आणखी १ ते १.५ कोटी रुपयांची उधळपट्टी करणार आहे, हा आर्थिक भुर्दंड कशासाठी?, असा सवाल भाजपाचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी केला आहे.

    कोरोनामुळे पालिका आर्थिक डबघाईला आल्याचे नगरसेवक गंगाधरे यांनी म्हटले आहे. केवळ प्रसिद्धीच्या कामासाठी तिसऱ्यांदा मोठी रक्कम खर्च करावी लागेल? पीआरचे काम हे महानगरपालिका आणि त्याचे नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या विकासकामांच्या नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी आहे. परंतु येथे फक्त सत्ताधारी पक्षाच्या बातम्या दिल्या जातात.

    महानगरपालिकेत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे आघाडीचे पक्ष असले तरी केवळ सत्ताधाऱयांच्याच बातम्या सकारात्मक अर्थाने ठळक केल्या जातात, इतर नगरसेवकांच्या कामाच्या बातम्या मात्र डावलल्या जात आहेत. साथीच्या काळात महानगरपालिकेने आधीच नागरिकांच्या सेवेसाठी खूप खर्च केला आहे आणि याद्वारे पीआर एजन्सीच्या या नवीन नियुक्त्याद्वारे महानगरपालीकेवरील अतिरिक्त आर्थिक उधळपट्टीला आमचा विरोध असल्याचे गंगाधरे यांनी म्हटले आहे.