लतादिदींच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून राज ठाकरेंपर्यंत अनेकांनी दिल्या शुभेच्छा, पाहा राजकीय नेत्यांच्या खास पोस्ट

आज लतादिदींच्या वाढदिवसानिमित्त अनेक जण त्यांना शुभेच्छा देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विधान सभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लता मंगेशकरांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.

  गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज ९२ वा वाढदिवस आहे.लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदोरमध्ये(Lata Mangeshkar Birthday Special) झाला. आज लतादिदींच्या वाढदिवसानिमित्त अनेक जण त्यांना शुभेच्छा देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विधान सभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लता मंगेशकरांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.

  नरेंद्र मोदी यांनी लतादिदींच्या वाढदिवसासाठी केलेल्या पोस्टमध्ये लता मंगेशकर यांना दिर्घायुष्य मिळो,अशी इच्छा व्यक्त केली आहे.

  शरद पवारांनी म्हटले आहे की, “भारतीय संगीताचा दरवळ विश्वात पसरवणाऱ्या, आपल्या अभिजात स्वरांनी संगीतकला संपन्न करणाऱ्या गानसम्राज्ञी लतादीदींना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा. आपल्या स्वरांची जादू रसिकांच्या मनावर अशीच चिरंतन राहो, आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा !”

  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लतादिदींना शुभेच्छा देताना म्हटले आहे की,“आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या सुवर्ण स्वरांनी अवघे संगीत विश्व भारले आहे. आपली ही ऊर्जा आणि आशीर्वाद आम्हाला सदैव प्रेरणा देत राहोत. आपणांस दीर्घायुरारोग्य लाभो हीच प्रार्थना.”

  राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की,“दैवी आवाजाची देणगी लाभलेल्या, ‘भारतीय गानकोकीळा’ लता दीदींना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”

  देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे की, “आदरणीय लतादिदी,आपणास वाढदिवसाच्या अनेक उत्तम शुभेच्छा!मी तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य चिंतितो!”