shivsena urdu calender

आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या हिंदुत्वाचा(hindutva of shivsena) मुद्दा ऐरणीवर आला आहे. शिवशाही कॅलेंडरमध्ये(shivshahi calender) उर्दू भाषेतील माहिती झळकल्यामुळे  भाजपा नेते शिवसेनेवर टीका करत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी(bhagatsingh koshyari) यांनी काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये त्यांनी हिंदुत्वाच्या(hindutva) मुद्द्यावरून काही प्रश्न विचारले होते. या प्रश्नांची उत्तर देताना उद्धव ठाकरे(uddhav thakre) म्हणाले होते की, “आम्हाला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची (प्रमाणपत्राची) गरज नाही”. त्यानंतर दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरुंग सकपाळ यांनी अजान स्पर्धा आयोजित केल्याने विरोधकांनी शिवसेनेला पुन्हा हिंदुत्वाबाबत प्रश्न विचारले होते. त्यानंतर काही दिवसांतच सकपाळ यांनी अजान स्पर्धेशी आपला संबंध नसल्याचा खुलासा केला. आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एका कॅलेंडरमुळे  भाजपा नेते शिवसेनेवर टीका करत आहेत.


भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी आज एका कॅलेंडरचा फोटो पोस्ट करत शिवसेनेवर टीका केली आहे. या कॅलेंडरवर शिवशाही कॅलेंडर २०२१ असं लिहिलं आहे. कॅलेंडरच्या कोपऱ्यांमध्ये शिवसेना आणि युवासेना असंही नमूद करण्यात आलं आहे. आश्चर्याची बाब ही आहे की हे कॅलेंडर मराठी, इंग्रजी तसेच उर्दू भाषेतही आहे. कॅलेंडरवर इंग्रजी महिन्यांच्या शेजारी इस्लामिक महिना आणि इतर गोष्टी लिहील्या आहेत.  या कॅलेंडरचा फोटो ट्विट करत ‘शिवसेनेला हिंदुत्वाच्या सर्टिफिकेटची गरज नाही….’, असा टोला भातखळखर यांनी लगावला आहे.