Bacchu Kadu

हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून सभागृहात मुख्यमंत्री हजर न राहिल्यामुळे विरोधक आक्रमक होत, मुख्यमंत्री उपस्थित राहत नाहीत यावरून आक्रमक होत, राजकारण करत आहेत. यावरच बोलताना मंत्री बच्चू कडू यांनी भाजपा मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे सुद्धा राजकारण करत आहे. त्यामुळे भाजप खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करत आहे, अशी बोचरी टीका मंत्री बच्चू कडू यांनी भाजपावर केले.

    मुंबई : हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून सभागृहात मुख्यमंत्री हजर न राहिल्यामुळे विरोधक आक्रमक होत, मुख्यमंत्री उपस्थित राहत नाहीत यावरून आक्रमक होत, राजकारण करत आहेत. यावरच बोलताना मंत्री बच्चू कडू यांनी भाजपा मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीचे सुद्धा राजकारण करत आहे. त्यामुळे भाजप खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करत आहे, अशी बोचरी टीका मंत्री बच्चू कडू यांनी भाजपावर केले.


     

    दरम्यान कोरोना काळातील शाळांनी आकारलेले 100% फी ही माफ करून 50 टक्के शालेय संस्थानी व महाविद्यालयांनी घ्यावी असे सुद्धा बच्चू कडू यांनी म्हटले. जबरदस्तीने फी वसूल करणाऱ्या 18 शाळावर आपण अमरावतीत कारवाई केल्याचे सुद्धा यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले.

    त्यामुळे कोरोना काळात शाळा, महाविद्यालय आणि संस्था यांनी थोडीशी संवेदना दाखवून, सकारात्मकता दाखवून फीसाठी कोणतीही आग्रही भूमिका न दाखवता पन्नास टक्केच फी घ्यावी असे सुद्धा बच्चू कडू यांनी म्हटले.

    दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर बोलताना कर्मचार्‍याच्या पगारात वाढ दिली आहे. त्यामुळे त्यानी आधीक जनतेला वेठीस न धरता संप मागे घेऊन कामावर रुजू व्हावे, असे सुध्दा कडू यांनी म्हटले. दरम्यान भाजप मुख्यमंत्र्यांच्या आजाराचे वाभाडे काढत, घाणेरडे राजकारण करत आहे खालच्या स्तराची राजकारण करत आहे, असे म्हणत मंत्री बच्चू कडू यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.