..अजूनही विषय समजला नसेल तर या दोन लिंक ऐका म्हणजे डोक्यात प्रकाश पडेल ; भाजपचा काँग्रेसच्या नेत्यांना सल्ला

काँग्रेसचे नेते म्हणजे अज्ञानाचा महामेरू आहेत. विजय वडेट्टीवार हे केंद्राकडे बोट दाखवतात, तर सचिन सावंत हे काही पत्राकडे बोट दाखवतात… अहो, पण एसईसीसीचा डेटा हा ५० टक्क्यांच्या आतल्या आरक्षणासाठी नाही, तर वरचे आरक्षण टिकले पाहिजे, यासाठी ती माहिती मागण्यात आली, असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

    मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा देखील राज्यात ऐरणीवर आला आहे. भाजप राज्य सरकारकडे बोट दाखवत असून आरक्षणाच्या मुद्यावर भाजपाने राज्यभरात चक्का जाम आंदोलन केलं. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारमधील मंत्री केंद्र सरकारला जबाबदार धरत आहेत. दरम्यान, अजूनही विषय समजला नसेल तर या दोन लिंक ऐका. त्याने २ फायदे होतील, एक म्हणजे डोक्यात प्रकाश पडेल आणि दुसरा म्हणजे आरक्षणाचा प्रश्न सोडविणे सोपे होईल, असा सल्ला भाजपाने काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे.

    राज्यात ओबीसी आरक्षणावरून प्रचंड राजकीय घमासान सुरू आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा शांत होत असताना ओबीसी आरक्षणामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. भाजपाकडून आंदोलन करण्यात आलं, तर सरकारमधील मंत्र्यांनी सर्व पक्षातील नेत्यांची बैठक बोलावली होती. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेस नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांना ट्विट करून उत्तर दिलं आहे.

    काँग्रेसचे नेते म्हणजे अज्ञानाचा महामेरू आहेत. विजय वडेट्टीवार हे केंद्राकडे बोट दाखवतात, तर सचिन सावंत हे काही पत्राकडे बोट दाखवतात… अहो, पण एसईसीसीचा डेटा हा ५० टक्क्यांच्या आतल्या आरक्षणासाठी नाही, तर वरचे आरक्षण टिकले पाहिजे, यासाठी ती माहिती मागण्यात आली, असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

    पुढे म्हणाले की, २०१३ मध्ये त्यावेळच्या डॉ. मनमोहनसिंग सरकारने एक आदेश काढला होता की, ही माहिती राज्यांना देऊ नका. कारण, हा संपूर्ण डेटा चुकीचा आहे. तो राज्यांना दिला तर अनेक गंभीर आणि नवीन प्रश्न निर्माण होतील. आणि अजूनही विषय समजला नसेल तर या दोन लिंक ऐका. त्याने २ फायदे होतील. १. डोक्यात प्रकाश पडेल २. आरक्षणाचा प्रश्न सोडविणे सोपे होईल, असा सल्ला देत केशव उपाध्ये यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सुनावलं आहे.