kirit somayya

प्रवीण राऊतचे पैसे आले तर  हिशोब द्यावाच लागणार ना असा सवाल किरिट सोमय्या यांनी संजय राऊत प्रकरणी विचारला आहे. संजय राऊतांनी चौकशीला सामोरे जावून सत्य काय ते सांगावे आणि धमक्या देणे थांबवावे अशी टीका सोमय्यांनी केली.

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीच्या ईडी चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. यावरुन आता भाजप नेते विरुद्ध संजय राऊत असा थेट सामना रंगला आहे. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी पू्न्हा एकदा संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

प्रवीण राऊत आणि संजय राऊत परिवार सिध्दांत सिस्कोम प्रा. लि. कंपनीमध्ये भागीदार आहेत. HDIL आणि प्रवीण राऊत पार्टनर, त्यांचा कंपनीत PMC बँकेचे १०० कोटी HDIL द्वारा आले असल्याचा आरोप किरिट सोमय्या यांनी केला आहे .