महाराष्ट्रात गब्बरचे राज्य आहे काय? भाजपा नेते शेलार यांचा शिवसेना नगरसेवकांना सवाल

मुंबईकरांनी निवडून दिलेल्या नगरसेविकांंना असभ्य बोलले जाते. त्यांना मारण्यासाठी गुंड बोलवले जातात. महाराष्ट्रात गब्बरचे राज्य आहे काय? असा सवाल करत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेत शुक्रवारी घडलेल्या घटनेची चौकशी करण्याची मागणी भाजप कार्यालयात शनिवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली(BJP leader Shelar's question to Shiv Sena corporators).

    मुंबई : मुंबईकरांनी निवडून दिलेल्या नगरसेविकांंना असभ्य बोलले जाते. त्यांना मारण्यासाठी गुंड बोलवले जातात. महाराष्ट्रात गब्बरचे राज्य आहे काय? असा सवाल करत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेत शुक्रवारी घडलेल्या घटनेची चौकशी करण्याची मागणी भाजप कार्यालयात शनिवारी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली(BJP leader Shelar’s question to Shiv Sena corporators).

    वरळी बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटातील जखमींना नायर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते.मात्र रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका बाळाचा मृत्यू झाला आणि आता बाळाच्या वडिलांचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेवर शेलार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारच्या मोठ्या दुर्घटनेनंतर रुग्ण पालिकेच्या रुग्णालयात उपचारांसाठी जात असेल आणि तिथेही तो सुरक्षित नाही. रुग्णांवर वेळेवर औषधोपचार होणार नाहीत. मुंबईच्या महापौर घटनेनंतर ७२ तासांनी रुग्णालयात पोहचल्या. ७२ तास कुठे झोपला होतात? मुंबई पालिकेत चालले आहे काय? असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.

    मुंबई पालिकेचा मुंबईकरांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचे म्हणत शेलार यांनी मुंबई पालिकेतील सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. शुक्रवारी पालिका सभागृहात झालेल्या घटनेची, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या वक्तव्याची चौकशी करावी,आवश्यक असल्यास गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. याचवेळी सत्ताधारी शिवसेनेने माहुल येथील ३० कोटींचा भूखंड पळवून बिल्डरच्या घशात घातल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. यावेळी भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, विनोद मिश्रा यांच्यासह नगरसेविका आणि मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये ही उपस्थितीत होते.