‘राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न, राज्यपालांनी हस्तक्षेप करावा’ भाजप नेत्यांची राज्यपालांकडे मागणी

लोढा म्हणाले की, “राज्यातील मंत्री इथल्या अधिकाऱ्यांना धमक्या देत आहेत. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा. तसंच मलिक यांना सरकारी अधिकाऱ्यांना धमकी द्यायची असेल तर त्यांनी आधी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.” असं लोढा यांनी म्हटलं आहे.

    राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना सरकारी अधिकाऱ्यांना धमकी द्यायची असेल तर त्यांनी आधी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. अशी मागणी भाजपचे मुंबई अध्यक्ष व माजी आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते.

    लोढा म्हणाले की, “राज्यातील मंत्री इथल्या अधिकाऱ्यांना धमक्या देत आहेत. त्यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा. तसंच मलिक यांना सरकारी अधिकाऱ्यांना धमकी द्यायची असेल तर त्यांनी आधी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.” असं लोढा यांनी म्हटलं आहे.

    पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्र सरकार मधीले मंत्री कायद्याचे उल्लंघन करत आहेत. सरकारी अधिकार्‍यांना धमकावलं जात असून ही बाब महाराष्ट्रासाठी दुर्देवी आहे. नवाब मलिक यांना सरकारी अधिकाऱ्यांना धमक्या द्यायच्या असतील तर त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. या घटना त्वरित थांबल्या नाहीत तर या संदर्भात आम्ही राष्ट्रपती, केंद्रीय गुहमंत्री यांची भेट घेऊ आणि वेळ पडलीच तर आम्ही कोर्टातही जाऊ, असा इशारा लोढा यांनी दिला.

    दरम्यान, सरकारी अधिकाऱ्यांना धमकी दिल्या प्रकरणी मुंबई भाजप शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. सरकारी अधिकऱ्यांना धमकी दिल्यामुळे नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करणारे निवेदन दिले असल्याचे मंगल लोढा यांनी सांगितले.