Why are Mumbaikars throwing Rs 1,600 crore into the sea? BJP opposes desalination of sea water

गेट वे ऑफ इंडिया परिसरात झालेल्या सीएए विरोधी आंदोलनावेळी मेहक प्रभू या तरुणीने फ्री काश्मीरचं पोस्टर झळकावलं होतं. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सी रिपोर्ट दाखल केला आहे. त्यामुळे मेहक निर्दोष ठरली आहे. त्यावरून भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी “हे सरकार तुकडे तुकडे गँगचे आहे की काय?”, असा प्रश्न विचारला आहे.

मुंबई: गेट वे ऑफ इंडिया परिसरात झालेल्या सीएए विरोधी आंदोलनावेळी मेहक प्रभू(mehek prabhu) या तरुणीने फ्री काश्मीरचं(free kashmir) पोस्टर झळकावलं होतं. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी(Mumbai police) सी रिपोर्ट दाखल केला आहे. त्यामुळे मेहक निर्दोष ठरली आहे. त्यावरून भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार(ashish shelar) यांनी “हे सरकार तुकडे तुकडे गँगचे आहे की काय?”, असा प्रश्न विचारला आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात आंदोलन करण्यात आलं होतं. या आंदोलनात  मेहक मिर्झा प्रभू या तरुणीने फ्री काश्मीर (काश्मीर मुक्त करा) पोस्टर झळकावलं होतं. त्यावरून बराच वाद झाला. त्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी सी रिपोर्ट दाखल केला असून, भाजपानं त्यावरून ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी ट्विट केले आहे की, “कसाबचा पाहुणचार बिर्याणीने केला. कन्हैया ज्यांना आपलासा वाटतो. त्या आघाडीच्या ठाकरे सरकारचे आता शहरी नक्षलवाद्यांना रेड कार्पेट ? आझाद काश्मीरचा नारा देणाऱ्या मेहक प्रभूच्या “हातात” मुंबई पोलीस आता निर्दोषत्वाचा दाखला देणार? हे सरकार तुकडे तुकडे गँगचे आहे की काय?,”