
२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींचे विचार सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी खादी प्रसारासाठी भाजप तर्फे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच स्वच्छताविषयक आणि आत्मनिर्भर संकल्पनेच्या प्रसारासाठी विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.
मुंबई : महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह पक्षाचे केंद्रीय व प्रदेश पदाधिकारी विविध ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमांत सहभागी होणार आहेत. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी ही माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
खादी प्रसारासाठी वेगवेगळे कार्यक्रम
२ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींचे विचार सामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी खादी प्रसारासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच स्वच्छताविषयक आणि आत्मनिर्भर संकल्पनेच्या प्रसारासाठी विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुणे येथील कार्यक्रमांत सहभागी होतील. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत कोथरूड (पुणे) येथे स्वच्छतागृहांचे सफाई अभियान, खादी दुकानांना भेट, फिरत्या वाचनालयाचे लोकार्पण असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
कोण कुठे साजरी करणार गांधी जयंती
नागपूर – देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे
नगर – मंत्री नितीन गडकरी
जालना – मंत्री रावसाहेब पाटील दानवे
मुंबई – विनोद तावडे, पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, आशिष शेलार
औरंगाबाद – विजया रहाटकर
शेगाव – संजय कुटे
कोल्हापूर – सुरेश हाळवणकर
नाशिक – देवयानी फरांदे
उस्मानाबाद – सुजितसिंह ठाकूर
पालघर – रवींद्र चव्हाण
हे नेते त्यांना देण्यात आलेल्या विभागात गांधी जयंती साजरी करणार आहेत. याशिवाय पक्षाचे प्रदेश स्तरावरील अनेक पदाधिकारी, खासदार, आमदार व अन्य लोकप्रतिनिधी या कार्यक्रमांत सहभागी होतील, असे माधव भांडारी यांनी पत्रकात नमूद केले आहे.