
४५ वर्षांनंतर राहुल गांधी यांनी कुठेतरी आणीबाणी ही चूक असल्याचे मान्य केले आहे. आता भाजपनेही गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावे, अशी मागणी नवाब मलिक यांनी विधान भवनाच्या मीडिया हाऊसमध्ये बोलताना केली.
मुंबई: माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेली आणीबाणी ही चूकच होती, असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आणीबाणीच्या निर्णयावर भाष्य केलं. दरम्यान, भाजपनेही गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावं, असं म्हणत राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मागणी केली आहे.
काय म्हणाले नवाब मलिक?
४५ वर्षांनंतर राहुल गांधी यांनी कुठेतरी आणीबाणी ही चूक असल्याचे मान्य केले आहे. आता भाजपनेही गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावे, अशी मागणी नवाब मलिक यांनी विधान भवनाच्या मीडिया हाऊसमध्ये बोलताना केली. जर काँग्रेस चूक सुधारण्याचा प्रयत्न करत आहे तर भाजप केव्हा चूक सुधारणार याची माहिती जनतेला द्यावी. दिल्ली दंगलीबाबत काँग्रेसने माफी मागितली होती, आता गुजरात दंगलीबाबत भाजपने माफी मागावी, असेही ते म्हणाले.
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी ?
तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात देशभरात आंदोलन पेटलं होतं. इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीवरून आजही काँग्रेसवर टीका केली जाते. याच निर्णयाबद्दल राहुल गांधी यांनी ती एक चूक होती, असं म्हटलेलं आहे.