Balasaheb-Thorat

भाजपने राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा करणे हेच दुर्देव आहे. नेत्याच्या मृत्यूनंतर उमेदवार दिला जात नाही. राजकारणात काही संकेत असतात. तरीही आम्ही भाजपला उमेदवार न देण्याची विनंती करू. असेही त्यांनी स्पष्ट केले. २००६ मध्ये प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली त्यावेळी भाजपच्या विनंतीवरून काँग्रेसने उमेदवार दिला नव्हता.

    मुंबई: काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचे कोरोनाने निधन झाल्याने राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काँग्रेसने भाजपला गळ घातली आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपला राज्यातील प्रथा परंपरेची आठवण करून दिली आहे.

    उमेदवारी मागे घेण्याच्या मुदतीपूर्वी विनंती
    भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर रिक्त जागेबाबत झालेल्या निर्णयाची आठवणच देत बाळासाहेब थोरात महाजन यांच्या जागी उमेदवार न देण्याचा आम्ही निर्णय घेतला होता असे सांगत साधारणपणे एखाद्या नेत्याचे निधन झाल्यावर त्या जागी उमेदवार न देण्याची प्रथा आहे, असे म्हटले आहे. ते म्हणाले की, आम्ही भाजपला उमेदवार न देण्याबाबत उमेदवारी मागे घेण्याच्या मुदतीपूर्वी विनंतीही करू, असेही थोरात म्हणाले.

    भाजपच्या विनंतीवरून काँग्रेसने उमेदवार दिला नव्हता
    ते म्हणाले की, भाजपने राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा करणे हेच दुर्देव आहे. नेत्याच्या मृत्यूनंतर उमेदवार दिला जात नाही. राजकारणात काही संकेत असतात. तरीही आम्ही भाजपला उमेदवार न देण्याची विनंती करू. असेही त्यांनी स्पष्ट केले. २००६ मध्ये प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर राज्यसभेची जागा रिक्त झाली त्यावेळी भाजपच्या विनंतीवरून काँग्रेसने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली होती. त्याचीच आठवण थोरात यांनी काँग्रेसला करून दिली आहे.